मुंबई, 15 ऑगस्ट: मराठी तसेच बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारा सर्वांचा लाडका आपला सिद्धू म्हणजे अभिनेता सिद्धार्थ जाधव. अभिनेत्यानं त्याच्या तगड्या अभिनयानं तर प्रेक्षकांची मन जिंकलीच मात्र सोशल मीडियावरही सिद्धार्थनं त्याचं नवं विश्व तयार केलं आहे. सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असलेला सिद्धार्थ त्याच्या आयुष्यातील अनेक गोष्ट शेअर करत असतो. त्याच्या मजेशीर पोस्ट नेहमीच सर्वांच लक्ष वेधून घेतात. मात्र नुकतीच सिद्धार्थनं एक पोस्ट शेअर केली जी पाहून त्याच्या चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. कारण सिद्धार्थ मागचा एक आठवडाभर आजारी असून हॉस्टिपटलमध्ये दाखल झाला होता. नुकताच त्याला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. सिद्धार्थनं स्वत: पोस्ट लिहित ही माहिती त्याच्या चाहत्यांना दिली आहे. सिद्धार्थनं सोशल मीडियावर पोस्ट लिहीत रुग्णालयातील फोटो शेअर केला आहे. ज्यात त्याच्या हातात हॉस्पिटलमधील स्टिकर घातलेला दिसत आहे. अभिनेता सिद्धार्थ जाधवचे तमाशा लाईव्ह आणि दे धक्का हे दोन सिनेमे बॅक टू बॅक प्रेक्षकांच्या भेटीला आले. दोन्ही सिनेमांचं सिद्धार्थनं दणकून प्रमोशन केलं. प्रमोशनसाठी सिद्धार्थ सतत धावपळ करत होतो. या सगळ्यात त्याच्या आरोग्याकडे त्याचं दुर्लक्ष झालं. त्यामुळे त्याची प्रकृती बिघडली आणि त्याला उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल व्हाव लागलं. सिद्धार्थला नेमकं काय झालं होतं हे मात्र त्यानं सांगितलेलं नाही. सिद्धार्थवर मुंबईच्या हिंदूजा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपतारांती त्याची प्रकृती आता बरी असून तो घरी परतला आहे. हेही वाचा - Independence day 2022: घरोघरी तिरंगा! मराठमोळ्या कलाकारांनी दणक्यात साजरा केला 75वा स्वातंत्र्यदिन
सिद्धार्थ आज 15 ऑगस्टच्या मुहूर्तावर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आणि तो घरी परतला आहे. त्यानं पोस्ट लिहित हॉस्पिटलमध्ये त्याची काळजी घेणाऱ्या सर्व डॉक्टर आणि त्याच्या नातेवाईकांचे आभार मानले आहेत. सिद्धार्थनं म्हटलंय, ‘गेला आठवडाभर मी हिंदूजा हॉस्पिटलमध्ये अँडमिट होतो. आज घरी आलो. मनापासून आभार हिंदूजाच्या हॉस्पिटलच्या स्टाफचं. खुप मनापासून काळजी घेतली माझी. मी बरा व्हा व्हा म्हणून ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांना मनापासून धन्यवाद’. पोस्टच्या शेवटी सिद्धार्थनं सर्वांना आपल्या तब्येतीकडे लक्ष देण्याचं आवाहन देखील केलं आहे. त्यानं म्हटलंय, ‘आता हळूहळू बरा होतोय. खुप धावपळ असते आपली. पण त्यातही स्वतःच्या हेल्थकडे दुर्लक्ष होणार नाही याची प्लिज काळजी घ्या’. सिद्धार्थच्या पोस्टनंतर त्याच्या चाहत्यांनी आणि सगळ्या मित्र मैत्रिणींनी त्याला काळजी घेण्याचा सल्ल देत प्रेमाचा वर्षाव केला आहे.