घरोघरी तिरंगा या मोहिमेला प्रतिसाद देत मराठमोळ्या कलाकारांनी दणक्यात आपला 75वा स्वातंत्र्यदिन साजरा केला आहे.
दगडी चाळ 2 सिनेमातील कलाकार स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी एकत्र आले. अभिनेत्री पूजा सावतंबरोबर अभिनेते मकरंद देशपांडे आणि अंकुश चौधरी.
तर सध्या डान्स महाराष्ट्र डान्स मध्ये परिक्षण करत असलेला अभिनेता गश्मीर महाजनीनं कुटुंबाबरोबर ध्वजारोहण केलं.
अभिनेता सुबोध भावेनंही पत्नी मंजिरी आणि मुलगा कान्हा आणि मल्हारबरोबर स्वातंत्र्यदिन साजरा केला. कुटुंबाबरोबरचा फोटो सुबोधनं शेअर केला.
बिग बॉस फेम सई लोकूर नुकतीच बाली ट्रिपहून परतली असून तिनं ही सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडनं देखील निसर्गाच्या सानिध्यात ध्वजारोहण करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
तर अभिनेत्री प्राजक्ता माळीनं 'आजपासून फोनवर हॅलो बंद, वंदेमातरम सुरू', असं म्हणत स्वातंत्र्यदिनी मोठा निर्णय घेतला आहे.
बिग बॉस फेम अभिनेता विकास पाटीलन विशाल निकम आणि जयवंत वाडकर यांच्याबरोबर मुंबईच्या समता नगर पोलीस ठाण्यात पोलिसांबरोबर ध्वजरोहण केलं.
तर अभिनेत्री अलका कुबल यांनी हर घर तिरंगा म्हणत घराबाहेर तिरंगा लावून स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
संदीप पाठकनं संपूर्ण कुटुंबाबरोबर फोटो शेअर करत स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्यात. त्याच्या फोटोनं सर्वांचं लक्ष वेधलं.