मुंबई, 17 मार्च : साऊथच्या ‘पुष्पा’ या ब्लॉकबस्टर सिनेमानं प्रेक्षकांना वेड लावलं. प्रेक्षकांप्रमाणेच कलाकार देखील पुष्पाचे फॅन्स झालेत. पुष्पाच्या श्रीवल्लीनं तर अनेकांना वेड लावलं. अभिनेत्री रश्मिका मंदानानं साकारलेली श्रीवल्ली प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतली. श्रीवल्ली आणि श्रीवल्लीचा डान्स सगळ्यांहून वेगळा ठरला. हीच श्रीवल्ली आता मराठमोळ्या रंगमंचावर अवतरणार आहे. अभिनेत्री रश्मिका मंदाना पहिल्यांदा मराठी कार्यक्रमात झळकणार आहे. झी चित्र गौरव पुरस्कार 2023मध्ये रश्मिका मंदाना ठुमके लावणार आहे. मराठमोळ्या गाण्यांवर पुष्पाची श्रीवल्ली थिरकताना दिसणार आहे. श्रीवल्लीला मराठी कार्यक्रमात पाहून मराठमोळ्या पुष्पानं देखील तिच्याबरोबर रोमान्स करण्याची एकही संधी सोडलेली नाही. मराठमोळा पुष्पा म्हणजेच अभिनेत्री श्रेयस तळपदे. झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याचं निवेदन अभिनेता श्रेयस तळपदे करणार आहे. श्रीवल्लीची एंट्री होताच श्रेयस रश्मिकावर फिदा झाला. मग रश्मिकानं देखील खुलेआम मराठमोळ्या पुष्पाबरोबर रोमान्स केला. हेही वाचा - Swara Bhasker Wedding: स्वरा भास्करच्या रिसेप्शनमध्ये पोहोचले राहुल गांधी, VIDEO समोर नेटकऱ्यांच्या कमेंट्स अभिनेता श्रेयस तळपदे पुष्पा हा सिनेमाचा महत्त्वाचा भाग आहे. पुष्पा सिनेमाच्या हिंदी वर्जनमध्ये पुष्पाच्या आवाजाचं संपूर्ण डबिंग श्रेयस तळपदेनं आहे. पुष्पा हे पात्र हिंदी आणि मराठी प्रेक्षकांना आपलंस कसं वाटेल यासाठी त्यानं डबिंग वेळी उत्तम काम करण्याचा प्रयत्न केला. श्रेयसचं हे काम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आणि “पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समजा क्या फायर हैं में फायर” हा डायलॉग चांगलाच फेमस झाला.
झी चित्र गौरवच्या मंचावार अभिनेत्री रश्मिका मंदानाची एंट्री होताच श्रेयसनं पुष्पामधील त्याचे दमदार डायलॉग मारले. “पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समजी क्या…” हा जबरदस्त डायलॉग मारत श्रेयसनं रश्मिकाला फ्लाइंग किसं केलं. त्यावर रश्मिका देखील लाजत लाजत श्रेयसला डोळा मारून फ्लाइंग किस देताना दिसत आहे. श्रेयसच्या अदांवर श्रीवल्ली चांगलीच फिदा झाल्याचं पाहायला मिळतंय. श्रेयस तळपदेनं झी चित्र गौरवचा प्रोमो शेअर केला आहे. येत्या 26 मार्चला संध्याकाळी 7 वाजता झी चित्र गौरवचं टेलिकास्ट होणार आहे. रश्मिकाच्या एंट्रीसाठी प्रेक्षकांनी उत्सुकता दाखवली आहे. श्रेयसनं देखील सोहळा पाहण्याचं आवाहन केलं आहे.

)







