मुंबई, 17 मार्च- बॉलिवूडमध्ये सध्या लग्नसराई सुरु असल्याचं दिसून येत आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच अभिनेत्री अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर केएल राहुलने लग्नगाठ बांधत लग्नसराईची सुरुवात केली होती. त्यांनतर कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्राने लग्नगाठ बांधत सर्वांना सुखद धक्का दिला होता. तसेच बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री स्वरा भास्कर नेसुद्धा गुपचूप लग्न करत सर्वांनाच चकित केलं होतं. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री स्वरा भास्करने गुपचूप कोर्ट मॅरेज करत सर्वांना धक्का दिला होता. अभिनेत्रीने समाजवादी पक्षाचा युवा नेता फहाद अहमदसोबत कोर्ट मॅरेज केलं होतं. याची माहिती अभिनेत्रीने स्वतः आपल्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत दिली होती. यांनतर त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. दरम्यान आपण पारंपरिक पद्धतीने लग्न करणार असल्याचं त्यांनी त्यावेळी जाहीर केलं होतं. (हे वाचा: 1 वर्षही टिकलं नाही ‘या’ सेलिब्रेटींचं लग्न; फर्स्ट वेडिंग अॅनिव्हर्सरीपूर्वीच घेतला घटस्फोट, एकाचे तर अनैतिक संबंध ) त्यानुसार आता स्वरा आणि फहादने पारंपरिक पद्धतीने लग्नगाठ बांधली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे हळदी, मेहंदी आणि संगीतचे कार्यक्रम सुरु होते. अभिनेत्रीने हळदी खेळतानाचे सुंदर फोटो शेअर केले होते. तसेच पप्रसिद्ध सेलिब्रेटी मेहंदी डिझायनर वीणा नागदा यांच्याकडून मेहंदी काढून घेतलेले फोटोही शेअर केले होते. तर आपल्या संगीत सोहळ्यामधील धम्माल व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने आपला आनंद व्यक्त केला होता.
दरम्यान स्वरा आणि फहादचं रिस्पेशनही पार पडलं. यामध्ये सेलिब्रेटींपासून राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही या रिस्पेशन पार्टीत सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा देत त्यांच्याशी संवाद साधला. प्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानीने हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
तसेच स्वरा भास्कर आणि फहाद अहमद यांच्या रिसेप्शन पार्टीत समाजवादी पक्षाच्या खासदार अभिनेत्री स्वरा भास्कर सहभागी झाल्या होत्या. या पार्टीचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.