जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ख्रिसमस दिवशी शशांक केतकरने चाहत्यांना दिली Good News, अभिनेता होणार 'बाबा'

ख्रिसमस दिवशी शशांक केतकरने चाहत्यांना दिली Good News, अभिनेता होणार 'बाबा'

ख्रिसमस दिवशी शशांक केतकरने चाहत्यांना दिली Good News, अभिनेता होणार 'बाबा'

अभिनेता शशांक केतकरने ख्रिसमसच्या दिवशी त्याच्या चाहत्यांबरोबर एक Good News शेअर केली आहे. अभिनेता शशांक केतकर बाबा होणार आहे, त्याने पत्नी प्रियांकाबरोबरचा एका क्यूट फोटो शेअर केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 25 डिसेंबर: प्रसिद्ध मराठी अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) बाबा होणार आहे. त्याने पत्नी प्रियांकाबरोबरचा एक Cute फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. प्रियांका-शशांकच्या या आनंदी फोटोवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. त्याने ही पोस्ट शेअर केल्यानंतर जितेंद्र जोशी, अभिजीत खांडेकर, नेहा पेंडसे, रुतुजा बागवे, सायली संजीव या आणि इतर अनेक कलाकारांंनी देखील शशांकला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान शशांकने ख्रिसमसच्या दिवशी ही पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे या दिवसाला साजेसं असं कॅप्शनही अभिनेत्याने या पोस्टला दिलं आहे. त्याने ही पोस्ट शेअर करताना असं म्हटलं आहे की, ‘आम्हाला हे माहित होतं की, सँटा येतो आणि गिफ्ट्सचा वर्षाव करतो. पण आम्हाला हे माहित नव्हतं की, आम्हालाही एक मिळेल ज्याकरता आम्ही आभारी आहोत. आम्हा तिघांकडूनही हॉलिडे सीझनच्या शुभेच्छा’.

जाहिरात

या फोटोमध्ये प्रियांकाचं Baby Bump दिसत आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद सर्वकाही सांगून जातो आहे. शशांक त्याच्या सोशल मीडियावर नेहमी प्रियांकाबरोबरचे फोटो शेअर करत असतो. 2017 मध्ये प्रियांका आणि शशांक यांनी विवाह केला होता. याआधीही या कपलचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, दरम्यान हा फोटो देखील अनेक चाहत्यांनी शेअर केला आहे. (हे वाचा- Wonder Woman 1984: कसा आहे नवा सिनेमा? पाहण्याआधी समीक्षक काय म्हणतात वाचा ) शशांक केतकर हा मराठी टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध चेहरा आहे. ‘होणार सून मी या घरची’, ‘हे मन बावरे’ या मालिकांमधून शशांक हा  घराघरात पोहोचलेला चेहरा आहे. आता शशांकही ‘Fathers Club’ मध्ये असणार आहे. याआधी अभिनेता आरोह वेलणकर याने देखील बाबा होणार असल्याची बातमी दिली आहे. अभिनेता प्रियदर्शन जाधव देखील दुसऱ्यांंदा बाबा झाला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात