जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'स्वराज्यरक्षक संभाजी' नंतर शंतनू मोघे पुन्हा साकारणार महाराज; सिनेमाचा फर्स्ट लुक समोर

'स्वराज्यरक्षक संभाजी' नंतर शंतनू मोघे पुन्हा साकारणार महाराज; सिनेमाचा फर्स्ट लुक समोर

shantanu moghe

shantanu moghe

शंतनू मोघे यांनी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतही शिवाजी महाराज साकारले होते. नव्या सिनेमातील त्यांचा पहिला लुक समोर आलाय.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 17 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती संपूर्ण महाराष्ट्रात जल्लोषात साजरी होणार आहे. सर्वत्र शिवजन्मोत्सवाची तयारी सुरू असताना सिनेक्षेत्रात महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे.  रावरंभा या सिनेमाची मागच्या काही दिवसांपासून चर्चा आहे. सिनेमात शिवाजी महाराज कोण साकारणार याकडे सर्वांचं लक्ष होत. अखेर शिवजयंतीच्या आधी महाराजांची भूमिका कोण साकारणार याचा खुलासा झाला आहे. प्रसिद्ध अभिनेते शंतनू मोघे रावरंभा सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे. सिनेमातील त्यांचा पहिला लुक समोर आला आहे. शंतनू मोघे यांनी स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतही शिवाजी महाराज साकारले होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजस्वी इतिहास अलीकडच्या काळातील अनेक सिनेमातून रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांना पहायला मिळतोय. महाराजांचा, त्यांच्या शिलेदारांचा पराक्रम, त्यांचे बलिदान तसेच शिवचरित्रातील अनेक महत्त्वपूर्ण प्रसंग या सिनेमातून मांडले गेले. त्यासाठी मराठीतील अनेक गुणी कलावंतांनी शिवरायांची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारली. आता आगामी ‘रावरंभा’ या मराठी सिनेमातून शंतनू मोघे हा गुणी अभिनेता छत्रपतींच्या व्यक्तिरेखेतून आपल्या समोर येत आहे. येत्या शिवजयंतीच्या निमित्ताने ‘रावरंभा’ सिनेमातील छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टर आपल्यासमोर प्रदर्शित झाले आहे. ‘मी छोटया पडद्यावर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळालं होतं. या भूमिकेचं गारुड आजही प्रेक्षकांच्या मनात असताना आता मोठया पडद्यावरही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळाल्यानं शंतनू मोघे यांनी आनंद व्यक्त केला. हेही वाचा - Tejaswini Lonari : डोक्यावर पदर, उरात अभिमान; तेजस्विनी लोणारीचं शिवजयंती निमित्तं खास फोटोशूट छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याबद्द्दल अभिनेता शंतनू मोघे म्हणाले, ‘की ‘रावरंभा’ हा अतिशय भव्यदिव्य व थक्क करणारा सिनेमा आहे. अभिनेता म्हणून मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की, ‘रावरंभा’ सिनेमात ‘मला  शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला  मिळतेय. ज्या उत्तुंग व्यक्तीमत्त्वाने आपला प्रेरणादायी इतिहास घडवला, समाजाला नवा विचार दिला, त्यामुळे अशी भूमिका साकारताना सोबत मोठी सामाजिक जबाबदारी नक्कीच असते’.

News18लोकमत
News18लोकमत

‘रावरंभा’ सिनेमाची पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांचे आहेत. छायांकन संजय जाधव तर संकलन फैजल महाडिक यांचे आहे. सहनिर्माते अजित भोसले आणि संजय जगदाळे आहेत. गुरु ठाकूर आणि क्षितिज पटवर्धन यांनी लिहिलेल्या गीतांना अमितराज यांनी संगीत दिलं आहे. पार्श्वसंगीत आदित्य बेडेकर यांचं आहे. वेशभूषा पौर्णिमा ओक,  रंगभूषा प्रताप बोऱ्हाडे, कलादिग्दर्शन वासू पाटील यांचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात