मुंबई 25 एप्रिल : अभिनेता संजय दत्तची (Sanjay Dutt)मुलगी त्रिशला दत्त (Trishala Dutt) अचानक चर्चेत आली आहे. त्रिशला ही चित्रपटसृष्टीपासून कोसो दूर आहे. पण सोशल मीडियावर ती सक्रिय असते. आणि त्यामुळेच ती चर्चेत आली आहे. तर त्रिशलाचं काही दिवांपूर्वी ब्रेकअप झालं आहे. सात वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांच ब्रेकअप झालं. त्रिशलाने स्वताच या गोष्टीचा खुलासा केला.
नुकताच त्रिशलाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंट वर एक चॅट सेशन (chat session) केला होता. त्यात तिच्या चाहत्यांनी तिला काही प्रश्व विचारले होते आणि त्रिशलाने त्यांची उत्तरं ही दिली होती. यावेळी एका युझरने त्रिशला ला तिच्या लाँग टाइम रिलेशनशीप विषयी विचारल, तेव्हा त्रिशला ने उत्तर दिलं की जवळपास सात वर्षे आमचं डेटींग सुरू होत. पण आता त्यांचं ब्रेकअप झालं आहे. आणि दोघेही त्यांच्या नव्या आयुष्यात खुश आहेत.
त्रिशला ने या प्रश्नावर उत्तर देत लिहीलं, “7 वर्षे... मी जास्त खोलात नाही जाणार की का आम्ही वेगळे झालो. पण हे सांगू शकते की आम्ही वेगवेगळ जीवन जगू इच्छित होतो. त्यामुळे आम्ही एकत्र मिळून हा निर्णय घेतला. तो त्यावेळी जे आयुष्य जगू इच्छित होता त्यासाठी मी तयार नव्हते. आम्हा दोघांमध्ये खूप अंतर होतं जे काळानुसार समोर येत गेलं.”
पुढे त्रिशला लिहिते, “आम्ही दोघे एकमेकांपासून वेगळे हात गेलो, ... अस होतं.... आता ते विवाहित आहे आणि आपल्या मुलांसोबत आहे, माझ्याकडून त्याला खूप सदिच्छा.” त्यानंतर एका युढरने विचारलं, “कोणी तुझ्यावर चीट केलय का?” तेव्हा त्रिशलाने “हो” असं उत्तर दिलं.
त्रिशला दत्त हि संजय दत्तच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे. आई रिचा शर्मा (Richa Sharma) हिच्या निधनानंतर ती आपल्या आजी आजोबांसोबत अमेरिकेत असते. चित्रपटसृष्टीशी तिचा काहीही संबध नसला तरीही सोशल मीडिया वर तिचे भरपूर फॉलोवर्स आहेत. त्रिशला ही एक सायकोथेरापिस्ट आहे. तसेच ती एका हेअर केर अकॅडमीची फाउंडर आहे.
Published by:News Digital
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.