मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

करण जोहर हटवणार नेपोटिझम टॅग, कार्तिक आर्यन नंतर जान्हवी कपूर चित्रपटातून बाहेर?

करण जोहर हटवणार नेपोटिझम टॅग, कार्तिक आर्यन नंतर जान्हवी कपूर चित्रपटातून बाहेर?

अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) ला चित्रपटातून काढण्यात आलं आणि त्यानंतर संपूर्ण सोशल मीडियावर करण जोहरवर टीका करण्यात आली. पण आता याच चित्रपटासंदर्भात नवी बातमी समोर येत आहे.

  • Published by:  News Digital

मुंबई 6 मे :  सध्या चित्रपटांचं प्रदर्शन तसेच चित्रिकरणही बंद असले तरीही बॉलिवूड (Bollywood)  मध्ये अनेक गोष्टी घडत असल्याचं दिसून येत आहे. त्यात प्रसिद्ध दिग्दर्शक, निर्माता करण जोहरचं (Karan Johar) नाव कायमच आघाडीवर पहायला मिळतं. काही दिवसांपूर्वी करणच्या धर्मा प्रोडक्शनचा चित्रपट ‘दोस्ताना 2’ (Dostana 2)  वरून मोठा वाद निर्माण झाला होता. अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) ला चित्रपटातून काढण्यात आलं आणि त्यानंतर संपूर्ण सोशल मीडियावर करण जोहरवर टीका करण्यात आली.

करण जोहरवर झालेल्या टीकेनंतर त्याने कार्तिक आर्यन ला सोशल मीडियावर अनफॉलो केलं. आणि हा सगळा वाद काही दिवस रंगला होता. पण आता याच चित्रपटासंदर्भात नवी बातमी समोर येत आहे. व चित्रपटातील मुख्य अभिनेत्री जान्हवी कपूरला (Janhavi Kapoor) ही आता चित्रपटातून बाहेर केल्याचं वृत्त समोर येत आहे.

एका वृत्तानुसार करण जोहर ला त्याच्यावरचा घराणेशाहीचा (Nepotism) टॅग हटवायचा आहे. व आपण इतरही कलाकांराना संधी देतो हे त्याला दर्शवायचं आहे. आणि त्यामुळेच आता जान्हवी कपूर देखिल चित्रपटातून बाहेर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गेली अनेक वर्षे करण वर घराणेशाहीचा आरोप होत आहे. तर कार्तिक सोबत झालेल्या विवादानंतर हा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला होता.

नेहा कक्करने शेअर केला लहाणपणीचा फोटो; देवीच्या जागरणात सुरू होता गाण्याचा सराव

 त्यामुळेच आता करण कार्तिकच्याही जागी घराणेशाही सोडून इतर कलाकारांना घेत आहे. यात अभिनेता राजकुमार राव (Rajkumar Rao), अक्षय कुमार (Akshay Kumar), सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) यांची नावं समोर येत आहे. तेव्हा आता चित्रपटात नक्की काय काय बदल होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

First published:

Tags: Bollywood, Janhavi kapoor, Karan Johar