Home /News /entertainment /

VIDEO:सलमान खान म्हणतोय 'प्यार करोना', COVID-19 वरील गाणं सोशल मीडियावर व्हायरल

VIDEO:सलमान खान म्हणतोय 'प्यार करोना', COVID-19 वरील गाणं सोशल मीडियावर व्हायरल

सलमान खानने त्याच्या यूट्यूब चॅनेलवरून कोरोनाला हरवण्याचा संदेश देणारं 'प्यार करोना' हे गाणं पोस्ट केलंय. या गाण्याला साजिद नाडियावालानं संगीत दिलं असून स्वतः सलमान खान आणि हुसैन दलाल यांनी हे गाणं लिहिलं आहे.

    मुंबई, 20 एप्रिल :  कोरोना व्हायरसमुळे देशातील अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. मार्च, एप्रिल आणि पुढील काही महिन्यांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या सिनेमांच्या तारखा तर पुढे ढकलण्यात आल्याच आहेत, पण त्याचबरोबर चित्रपटांचे शूटिंग देखील थांबवण्यात आले आहेत. यावेळी अनेक बॉलिवूड कलाकार आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवताना दिसत आहेत. अभिनेता सलमान खान देखील त्याच्या कुटुंबाबरोबर पनवेल याठिकाणच्या त्याच्या फार्म हाऊसवर आहे. याठिकाणावरून सलमान अनेकदा काही व्हिडीओ पोस्ट करत असतो. लॉकडाऊनच्या काळात सलमान खानचे काही व्हिडीओ खूप व्हायरल झाले आहेत. (हे वाचा-'संतांची नाही, नराधमांची भूमी जास्त योग्य', पालघर प्रकरणावर सुमित राघवन संतापला) दरम्यान सलमान खानने अनेक गरजूंना मदत देखील केली आहे. मात्र आता त्याने कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी देखील पुढाकार घेतला आहे. काही दिवसांपूर्वी त्याने घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले होते. आता त्याने त्याच्या यूट्यूब चॅनेलवरून कोरोनाला हरवण्याचा संदेश देणारं एक गाणं पोस्ट केले आहे. या  गाण्याचे बोल 'प्यार करोना' (Pyar Karona by Salman Khan) असे आहेत. सोशल मीडियावर या गाण्याचा टीझर आल्यापासूनच पसंती मिळते आहे. या गाण्याला संगीत साजिद नाडियावालानं दिलं असून हे गाणं स्वतः सलमान खान आणि हुसैन दलाल यांनी लिहिलं आहे. विशेष म्हणजे हे गाणं  सलमाननं हे गाणं घरी राहूनच शूट केलं आहे. सलमान खान मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. त्यानं आतापर्यंत कोरोनाबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी अनेक व्हिडीओ शेअर केले आहेत. सध्या सलमाननं त्याच्या अर्ध्या फॅमिलीसह पनवेल मधील त्याच्या फार्म हाऊसवर अडकला आहे. त्याच्यासोबत त्याच्या दोन्ही बहिणी आणि त्यांचे कुटुंबीय अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस, गर्लफ्रेंड यूलिया वंतूर, सोहेल खानचा मुलगा आणि त्याचे दोन मित्र आणि स्टाफसह 22 माणसं या फार्म हाऊसवर अडकली आहेत. तर त्याचे आई-वडील मात्र मुंबईमध्ये आहेत. संपादन - जान्हवी भाटकर
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Salman khan, Salman khan news

    पुढील बातम्या