Home /News /entertainment /

'माझ्यासमोर बंदूक ठेवून सिनेमासाठी होकार द्यायला लावला', अभिनेत्याने शेअर केला धक्कादायक अनुभव

'माझ्यासमोर बंदूक ठेवून सिनेमासाठी होकार द्यायला लावला', अभिनेत्याने शेअर केला धक्कादायक अनुभव

अभिनेता रोहित रॉय (Rohit Roy) येणाऱ्या काळात जॉन अब्राहमबरोबर (John Abraham) 'मुंबई सागा' (Mumbai Saga) या गँगस्टर चित्रपटात दिसणार आहे.

    मुंबई, 22 जून : गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून घरी असणाऱ्या कलाकारांनी सध्या ही 'न्यू नॉर्मल' जीवनशैली आत्मसात केली आहे. मात्र हळूहळू चित्रपटांचे, मालिकांचे शूटिंग सुरू होत आहे. दरम्यान अभिनेता रोहित रॉय (Rohit Roy) येणाऱ्या काळात जॉन अब्राहमबरोबर (John Abraham) 'मुंबई सागा' (Mumbai Saga) या गँगस्टर चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील काही दृश्य आणि गाण्यांचे चित्रिकरण शिल्लक असल्याने, पुढील महिन्यात पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. यामध्ये रोहित रॉय जयकर शिंदे उर्फ बाबाची भूमिका साकारत आहे. यामध्ये रोहित एका गुंडाची भूमिका साकारत आहे. भूमिकेसाठी आवश्यक असणारे 80 किलो वजन कायम ठेवण्यासाठी कलाकाराने खूप मेहनत घेतल्याचे त्याने एका मुलाखतीमध्ये स्वत: सांगितले आहे. मुंबई मिररने याबाबत वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी रोहितने काजल अग्रवालच्या (Kajal Aggrawal) वाढदिवशी मुंबई सागाच्या सेटवरील काही फोटो देखील शेअर केले होते.
    दरम्यान याबाबत बोलत असताना रोहितने एक किस्सा सांगितला. तो म्हणाला की, 'एका चित्रपटाची स्टोरी ऐकण्यासाठी मला बोलावण्यात आले होते. यावेळी माझ्या दिशेने एक बंदूक देखील ठेवण्यात आली होती. माझ्याकडे चित्रपटाला होकार देण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता. पण शेवटी हा चित्रपट झालाच नाही.' अभिनेत्याच्या सुरुवातीच्या काळात त्याचा अंडरवर्ल्डशी सामना झाल्याचा अनुभव त्याने यावेळी शेअर केला. (हे वाचा-सुशांतकडून निसटलेले चित्रपट मिळाले होते या खास अभिनेत्याला, 3 टीम करत आहेत तपास) दरम्यान यावेळी रोहित रॉय जॉन अब्राहम आणि हृतिक रोशन या दोघांबद्दलही भरभरून बोलला. 'मुंबई सागा' व्यतिरिक्त त्याने जॉनबरोबर 'शूटआउट अ‍ॅट वडाला' मध्ये काम केलं आहे तर हृतिकबरोबर तो काबिल मध्ये दिसला होता. यामध्ये त्याच्या भूमिका लक्षात राहण्यासारख्या होत्या.
    First published:

    Tags: John abraham

    पुढील बातम्या