मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

आमिर पाठोपाठ ‘या’ अभिनेत्यानं सोशल मीडियाला केलं गुडबाय

आमिर पाठोपाठ ‘या’ अभिनेत्यानं सोशल मीडियाला केलं गुडबाय

अभिनेता रबी दुबे (Ravi Dubey) यानं सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे. (Instagram account delete) त्यानं आपलं इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 26 मार्च: सोशल मीडिया (social media) हे अत्यंत प्रभावी माध्यम आहे. हे माध्यम एखाद्या सामान्य व्यक्तीला देखील रातोरात सुपरस्टार बनवू शकतं. त्यामुळंच सतत चर्चेत राहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी मंडळी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करताना दिसतात. परंतु यामुळं सेलिब्रिटींची प्राव्हसी देखीस आता पहिल्यापेक्षा कमी झाली आहे. परिणामी यावर उपाय म्हणून अभिनेता रबी दुबे (Ravi Dubey) यानं सोशल मीडियाला रामराम ठोकला आहे. (Instagram account delete) त्यानं आपलं इन्स्टाग्राम अकाऊंट डिलीट करण्याचा निर्णय घेतला आहे.

रवीनं इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करुन ही माहिती आपल्या चाहत्यांना दिली. “मी पुढील काही दिवस इंस्टाग्राम डिलीट करत आहे.” अशा आशयाची पोस्ट त्यानं लिहिली आहे. ही पोस्ट वाचताच चाहते आणि त्यांचे जवळचे मित्र चकित झाले आहेत. प्रसिद्ध टीव्ही कलाकाराने हा असा निर्णय का घेतला?, हे प्रत्येकास जाणून घ्यायचे आहे.

अवश्य पाहा - सुशांतची बहिण अडकली संकटात; रियाची तक्रार मागे घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

View this post on Instagram

A post shared by Ravi Dubey 1 (@ravidubey2312)

रवी सध्या आपल्या कामात प्रचंड व्यस्त आहे. कामावरुन घरी आल्यानंतर तो बराचसा वेळ सोशल मीडियावर घालवत होता. यामुळं त्याच्या कुटुंबीयांसोबत त्याला वेळ घालवता येत नव्हता. त्यामुळं त्यानं थेट सोशल मीडियाचा वापरच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. आता तो केवळ आपल्या कामावर आणि कुटुंबीयांवरच लक्ष केंद्रित करणार आहे. त्याला त्याची प्रायव्हसी परत हवी आहे. अन् त्याची सुरुवात त्यानं इन्स्टाग्रामचा वापर थांबवून केली आहे. यापूर्वी असंच काहीसं कारण देत आमिर खाननं देखील सोशल मीडियाचा वापर थांबवला होता.

First published:

Tags: Entertainment, Instagram, Ravi dubey, Social media and relationships, Tech news