मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सुशांतची बहिण अडकली संकटात; रियाची तक्रार मागे घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

सुशांतची बहिण अडकली संकटात; रियाची तक्रार मागे घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

संतापलेल्या रियानं त्यांच्याविरोधात तक्रार देखल केली होती. ही तक्रार रद्द करण्यासाठी सुशांतची बहिण प्रियांका सिंह हिनं सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. मात्र तिची ही विनंती न्यायालयानं फेटाळून लावली आहे.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 26 मार्च: अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) मृत्यूला आठ महिने उलटून गेले आहेत. मात्र हे प्रकरण अद्याप शांत झालेलं नाही. सुशांतच्या मृत्यूसाठी सध्या अभिनेत्री रिया चक्रवर्तीला (Rhea Chakraborty) जबाबदार धरलं जात आहे. अर्थात याबाबत अद्याप कुठलाही पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. परंतु सुशांतचे कुटुंबीय मात्र वारंवार रियावर आरोप करत आहे. अखेर संतापलेल्या रियानं त्यांच्याविरोधात तक्रार देखल केली होती. ही तक्रार रद्द करण्यासाठी सुशांतची बहिण प्रियांका सिंह हिनं सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. मात्र तिची ही विनंती न्यायालयानं फेटाळून लावली आहे.

रिया चक्रवर्तीनं सुशांतचं आर्थिक आणि मानसिक शोषण केलं होतं. असा आरोप प्रियांका हिनं केला होता. शिवाय या गुन्ह्यासाठी तिला अटक करावी अशी मागणी देखील ती वारंवार करत होती. दरम्यान हे आरोप रियानं फेटाळून लावले व उलट प्रियांका आणि तिच्या बहिणीविरोधात तक्रार केली. ही तक्रार रद्द करण्यासाठी प्रियांकानं सर्वप्रथम मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परंतु तिथे ही याचिका फेटाळण्यात आली. त्यानंतर तिनं थेट सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला परंतु मिळालेल्या माहितीनुसार सुप्रिम कोर्टातही तिची याचिका तग धरु शकली नाही. तिथेची तिची याचिका फेटाळून लावण्यात आली आहे. आता प्रकरणी प्रियांकाची चौकशी केली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 अवश्य पाहा - संगीतकार होण्यासाठी ‘या’ गायकानं सरकारी नोकरीवर मारली लाथ

सुशांत प्रकरणात रियाची अद्याप निर्दोष सुटका झालेली नाही. या प्रकरणात आता एक नवा ट्विस्ट आला आहे. एनसीबीनं न्यायालयासमोर 30 हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलं. एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी स्वतः हे आरोपपत्र सादर केलं. या आरोपपत्रात रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावासोबतच आणखी 30 जणांनी नावं आहेत. शिवाय या प्रकरणी काही ड्रग्ज पेडलर्सला देखील एनसीबीनं अटक केली आहे.

14 जून 2020 रोजी सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह संशयास्पद आढळून आला होता. त्यानंतर एम्स रुग्णालयाकडून सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण शोधण्यासाठी प्रयत्न सुरु होता. यासाठी डॉक्टर सुधीर गुप्ता यांच्या नेतृत्त्वाखाली तज्ञ डॉक्टरांची एक टीम तयार करण्यात आली होती. डॉक्टरांच्या टीमनं दिलेल्या माहितीनुसार सुशांतनं आत्महत्या केली होती. हा रिपोर्ट सीबीआयकडे देखील सोपवण्यात आला. सीबीआयने एम्स रुग्णालयाकडे पोस्टमॉर्टम तसंच व्हिसेरो रिपोर्टचा अभ्यास करण्याची विनंती केली होती. एम्स डॉक्टरांनी दिलेली माहिती आणि सीबीआय तपासात समोर आलेल्या गोष्टी एकत्र करुन पडताळून पाहिल्या जात आहेत.

First published:

Tags: Entertainment, Rhea chakraborty, Sushant Singh Rajput, Sushant singh rajput case