मुंबई, 11 जून : अभिनेता शाहरुख खाननं 2006 आलेल्या डॉन सिनेमाच्या रिमेकमध्ये मुख्य भूमिका साकारली आणि या भूमिकेसोबतच त्यानं डॉन म्हणून अमिताभ यांची जागाही आपल्या नावे केली. या सिनेमाचं दिग्दर्शन फरहान अख्तरनं केलं आहे. शाहरुखच्या या सिनेमानं बॉक्स ऑफिसवरही चांगला गल्ला जमवला. या सिनेमात प्रियांका चोप्रा, करीना कपूर बोमन इरानी यांच्या महत्त्वाच्या भूमिका होत्या. पण यातील शाहरुखच्या अभिनयाचं प्रेक्षकांनी विशेष कौतुक केलं.
फरहान अख्तरनं पुन्हा एकदा शाहरुखला घऊन या सिनेमाचा सिक्वेलचीही निर्मिती केली. 2011मध्ये आलेल्या ‘डॉन 2’ ला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं आणि या सिनेमाने 200 कोटींची कमाई केली. पण आता या सिनेमाचा तिसरा भागही येणार असल्याची चर्चा आहे. पण या सिनेमामध्ये शाहरुख नाही तर अभिनेता रणबीर कपूरचा मुख्य भूमिकेसाठी विचार केला जात आहे. बाथरूममध्ये पडून चाहत्याचा अपघाती मृत्यू, बातमी ऐकून रणवीर झाला भावुक
‘डॉन 3’मध्ये शाहरुख खानच्या जागी रणबीर कपूर एंट्री करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण या फ्रेंचाइजीला पुढे नेण्यासाठी शाहरुखला रिप्लेस करणं एक विचार करून घेतलेला निर्णय ठरु शकतो. या अगोदर शाहरुखला रणवीर सिंह रिप्लेस करू शकतो असं म्हटलं जात होतं पण आता त्याच्या जागी रणबीर कपूरचं नाव घेतलं जात आहे. ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला कॉपी केल्यानं मलायका अरोरा होतेय ट्रोल मागील वर्षी असंच काहीसं ‘सिंघम’ सिनेमाच्या बाबततही झालं होतं. ‘सिंघम’ सीरिजमध्ये रणवीर सिंहला घेऊ ‘सिंबा’ची निर्मिती करण्यात आली. अशाच प्रकारे ‘डॉन 3’मध्येही आपल्याला दोन वेगवेगळे डॉन दिसू शकतात. अनुष्काला ‘या’ नावानं हाक मारतो युवराज सिंग, ट्विटर पोस्टमुळे गुपित उघड