मुंबई, 11 जून : भारताचा अष्टपैलू खेळाडू आणि 2011च्या वर्ल्डकपच्या विजयाचा हिरो युवराज सिंगनं काल (सोमवार 10 जून) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मुंबईतील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत युवीनं त्याच्या निवृत्तीची घोषणा केली. युवराजनं भारतीय संघाला जे योगदान दिनं ते त्याचे चाहते कधीच विसरू शकत नाहीत. युवराजच्या नुवृत्तीच्या घोषणेनंतर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची पत्नी आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मानं ट्विटरवरुन युवराजसाठी एक पोस्ट लिहिली. अनुष्कानं युवराजसाठी एक खास मेसेज लिहिला. पण त्यावर युवराजनं दिलेल्या रिप्लायमुळे अनुष्का शर्मा आता चर्चेत आली आहे. बाथरूममध्ये पडून चाहत्याचा अपघाती मृत्यू, बातमी ऐकून रणवीर झाला भावुक
Thank you for the memories @YUVSTRONG12 . You've been a warrior and inspiration to so many. I wish you the best in the next inning of your life 🌟🌟🌟
— Anushka Sharma (@AnushkaSharma) June 10, 2019
अनुष्कानं युवराजसाठी लिहिलेल्या पोस्टमध्ये त्याला एका योद्ध्याची उपमा दिली आहे. तिनं लिहिलं, ‘तू एक योद्धा आहेस आणि सर्वांसाठी एक प्रेरणास्थान आहेस. तुझ्यासोबतच्या सर्व आठवणीसाठी धन्यवाद आणि जीवनातील नव्या इनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा.’ यावर युवराजनं तिला रिप्लाय देताना म्हटलं, ‘थँक्यू रोझी वहिनी, देवाची कृपा तुमच्यावर नेहमी राहो’ या पोस्ट नंतर युवराज अनुष्काला ‘रोझी’ नावानं हाक मारतो हे सर्वांना समजलं. VIRAL VIDEO : बँकॉकच्या गल्लीत कपडे विकताना दिसली ‘भारत’ची ही अभिनेत्री
युवराज सिंग आणि विराट कोहली यांची घनिष्ठ मैत्री आहे. त्या दोघांना अनेकदा एकत्र मस्ती मस्कारी करताना पाहण्यात आलं आहे आणि अनुष्का सुद्धा त्यांच्यासोबत अनेकदा असते. अनुष्काला रोझी म्हणण्याची युवराजची ही पहिली वेळ नाही. अनुष्काच्या वाढदिवसाला सुद्धा युवराजनं तिला रोझी वहिनी असं म्हणत शुभेच्छा दिल्या होत्या. तो नेहमीच तिला रोझी म्हणून हाक मारताना दिसतो पण हे असं का याचा खुलासा मात्र युवराज किंवा अनुष्कानं केलेला नाही.
अनुष्का व्यतिरिक्त बॉलिवूड कलाकारांनी युवराजसाठी मेसेज आणि पोस्ट लिहिल्या. अनुपम खेर यांनी सुद्धा युवराजसाठी खास ट्वीट केलं. त्यांनी लिहिलं, युवराज भारतीयांमध्ये फक्त एक क्रिकेटर म्हणूनच नाही एका अशी प्रेरणादायी व्यक्ती आहे, जी फक्त विजेता आहे. तुमच्यासारखे लोक कधीच निवृत्त होत नाहीत ते लोकांच्या मनात नेहमीच राहतात. ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीला कॉपी केल्यानं मलायका अरोरा होतेय ट्रोल
I would always be asked this question..who are your favourite cricketers n One of the names in my reply would always b ur name @YUVSTRONG12 ...that’s never going to change ..The life n times of @YUVSTRONG12 ...you will always b missed but never forgotten our friend our hero...❤️ pic.twitter.com/9353zv0miI
— Neha Dhupia (@NehaDhupia) June 10, 2019