मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /बडे अच्छे लगते हैं 2 ला नकुल मेहताचा रामराम! म्हणाला, तेच तेच कथानक...

बडे अच्छे लगते हैं 2 ला नकुल मेहताचा रामराम! म्हणाला, तेच तेच कथानक...

नकुल मेहता

नकुल मेहता

बडे अच्छे लगते हैं 2 च्या प्रेक्षकांसाठी मात्र एक वाईट बातमी समोर आली आहे. मालिकेतील अभिनेता नकुल मेहतानं मालिकेला रामराम ठोकला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 28डिसेंबर : 'बडे अच्छे लगते हैं' या टेलिव्हिजनच्या हिट मालिकेनं प्रेक्षकांचं प्रचंड कौतुक केलं.  साक्षी तंवर आणि राम कपूर यांच्या जोडीनं बडे अच्छे लगते हैं चा पहिला सीझन प्रेक्षकांना खूप आवडला. राम आणि प्रिया यांची जोडी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. पहिल्या सक्सेसफुल सीझननंतर बडे अच्छे लगते हैं चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला. दुसऱ्या सीझनमध्ये अभिनेता नकुल मेहता आणि दिशा परमार यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. बडे अच्छे लगते हैं 2 च्या प्रेक्षकांसाठी मात्र एक वाईट बातमी समोर आली आहे.  मालिकेतील अभिनेता नकुल मेहतानं मालिकेला रामराम ठोकला आहे. नकुल मालिका सोडणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या मात्र अखेर नकुलनं मालिकेला रामराम ठोकला आहे.

अभिनेता नकुलनं बडे अच्छे लगते हैं 2 ही मालिका सोडण्याचं कारण देखील सांगितलं आहे. हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत नकुलनं म्हटलंय, 'या मालिकेला प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम मिळालं. आम्ही मालिका सुरू केली तेव्हा अनेकांनी आम्हाला हा आयकॉनिक शो असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या.  हा प्रवास लोकांपर्यंत ज्या पद्धतीनं पोहोचला आहे तो प्रवास फार स्पेशल आहे. मी दिर्घ काळ या मालिकेचा एक भाग होतो. पण मालिकेचं कथानक अनेक ठिकाणी फिरत होतं. आणि मला नाही वाटतं की आता यात काही नवीनपणा राहिला आहे. मी राम या व्यक्तिरेखेला खूप मिस करेन'.

हेही वाचा  - Salman Khan: आधी मिठी मारली अन नंतर केलं किस; सलमान खानचे EX गर्लफ्रेंड संगीता बिजलानी सोबत फोटो व्हायरल

View this post on Instagram

A post shared by Nakuul Mehta (@nakuulmehta)

बडे अच्छे लगते हैं मालिकेत अभिनेता नकुल मेहता हा शिवाय आणि राम अशा दोन भूमिका करत होता.   नकुलनं त्याच्या 10वर्षांच्या करिअरमध्ये केवळ 3-4 मालिका केल्या.  पण अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या भूमिका सतत करत राहणं हा प्रेक्षकांवर अन्याय आहे असं त्यानं म्हटलं. तो म्हणतो, 'जर लोक तुम्हाला शिवाय आणि राम म्हणून पाहत आहेत तर त्यांनी त्या भूमिकेचा स्वीकार करावा असं वाटणं हे चुकीचं आहे. मी विश्वासार्ह आणि माझ्या सन्मानासाठी काम करतो. तुम्ही टेलिव्हिजन आणि सिनेमात स्टार होऊ शकता पण कलाकारासाठी प्रेक्षक खूप महत्त्वाता आहे आणि त्यांना कधीच हलक्यात घेत नाही'.

बडे अच्छे लगते हैं 2च्या निमित्तानं अभिनेता नकुल मेहता आणि दिशा परमार हे दोन्ही कलाकार अनेक वर्षांनी एकत्र आले. दोघांनी त्यांच्या करिअरची सुरूवात टेलिव्हिजनपासून केली होती. 2012मध्ये 'प्यार का दर्द मै मीठा मीठा प्यारा प्यारा' मध्ये दोघांनी एकत्र काम केलं होतं. त्यानंतर 9 वर्षांनी दोघे बडे अच्छे लगते है 2च्या निमित्तानं एकत्र आले.

First published:

Tags: Tv actor, Tv shows