जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Lokesh Gupte: 'मन अटक गया है'; शूटिंगच्या शेवटच्या दिवशी अभिनेता झाला भावुक

Lokesh Gupte: 'मन अटक गया है'; शूटिंगच्या शेवटच्या दिवशी अभिनेता झाला भावुक

Lokesh Gupte: 'मन अटक गया है'; शूटिंगच्या शेवटच्या दिवशी अभिनेता झाला भावुक

अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये दिसून आलेला अभिनेता लोकेश गुप्ते आता दिग्दर्शन करताना बघायला मिळणार आहे. त्याच्या या सिनेमाची बरीच चर्चा होताना दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 03 ऑगस्ट: मराठी इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाने नाव कमावलेला लोकेश गुप्ते हा सरस अभिनेता येत्या काळात दिग्दर्शनाची धुरा सांभाळताना दिसणार आहे. लोकेश सध्या त्याच्या दिग्दर्शक म्हणून पहिल्या वहिल्या फिल्मसाठी लंडनमध्ये शूटिंग करायला गेल्याच समोर आलं होतं. आता लवकरच त्याच्या सिनेमाचं wrap होणार असून यानिमित्ताने एक खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. लोकेश ‘Congratulations’ नावाचा (lokesh gupte new film) सिनेमा घेऊन लवकरच भेटीला येणार आहे. सिद्धार्थ चांदेकर, पूजा सावंत, अलका कुबल अशी मोठी स्टारकास्ट असलेला हा सिनेमा लंडनमध्ये चित्रित होत आहे. या सिनेमाच्या शूटिंगचा आज शेवटचा दिवस असून लोकेश इमोशनल झाल्याचं समोर आलं आहे. तो इन्स्टाग्राम पोस्टमध्ये असं लिहितो, “आज शूटिंगचा शेवटचा दिवस. संमिश्र भावना मनात आहेत. मागचे दोन महिने हे माझ्यासाठी आणि माझ्या टीमसाठी एका रोलर कोस्टर राईडसारखे होते. पण आम्ही त्यातून यशस्वीपणे मार्ग काढून या दिवसांना कायम स्मरणात राहतील असे यादगार बनवले आहेत. इथे खरंच मन अडकून राहिलं आहे.” या स्पेशल व्हिडिओच्या मागे अटक गया है हे गं ऐकू येत असून त्याचा जीव नक्कीच सिनेमामध्ये गुंतला असल्याचं समोर येत आहे.

जाहिरात

लोकेश या सिनेमाशी निगडित अनेक अपडेट्स गेले अनेक दिवस शेअर करत आहे. नुकतंच सिनेमाच्या टीमने अलका कुबल यांच्या शूटिंगच्या शेवटच्या दिवशी त्यांना निरोप देत एक खास व्हिडिओ बनवला होता. **हे ही वाचा-** Urmila Nimbalkar: लेकाच्या पहिल्या वाढदिवशी उर्मिला साजरं करतेय आईपण; अभिनेत्रीची फिटनेस जर्नी चर्चेत तसंच सिद्धार्थ चांदेकर आणि पूजा सावंत सुद्धा वेगवेगळ्या फनी व्हिडिओ मधून लंडनमध्ये केलेली धमाल चाहत्यांसोबत शेअर करत होते. या सिनेमाची स्टारकास्ट आणि कलाकारांनी केलेली धमाल बघून सिनेमाबद्दल बरीच उत्सुकता दिसून येत आहे. याचं कथानक नेमकं कसं आहे याबद्दल कोणताही अपडेट समोर आला नाहीये.

लोकेश गुप्ते याला आजवर प्रेक्षकांनी एक उत्तम अभिनेता म्हणून पाहिलं आहे. अनेक सुपरहिट मालिका आणि सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. त्याला दिग्दर्शकाच्या रूपात बघायलाही चाहते उत्सुक आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात