जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Urmila Nimbalkar: लेकाच्या पहिल्या वाढदिवशी उर्मिला साजरं करतेय आईपण; अभिनेत्रीची फिटनेस जर्नी चर्चेत

Urmila Nimbalkar: लेकाच्या पहिल्या वाढदिवशी उर्मिला साजरं करतेय आईपण; अभिनेत्रीची फिटनेस जर्नी चर्चेत

Urmila Nimbalkar: लेकाच्या पहिल्या वाढदिवशी उर्मिला साजरं करतेय आईपण; अभिनेत्रीची फिटनेस जर्नी चर्चेत

उर्मिलाच्या मुलाचा म्हणजे अथांगचा आज पहिला वाढदिवस असून यानिमित्ताने तिने केलेली इन्स्टाग्राम पोस्ट सध्या गाजताना दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 03 ऑगस्ट: मराठीतील एक लोकप्रिय युट्युबर म्हणून ओळख असणारी उर्मिला निंबाळकर गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. उर्मिला ही मराठीमधील अगदी बोटावर मोजता येणाऱ्या युट्युबरपैकी एक असून तिच्या चॅनेलला नेहमीच भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतो. नेहमीच आनंदी, प्रसन्न आणि टवटवीत असणाऱ्या उर्मिलाच्या आयुष्यात आज खूप आनंदाचा दिवस आहे. तिच्या लेकाचा आज पहिला सध्या त्यासोबत उर्मिला (urmila nimbalkar and son athang) स्वतःच्या आईपणाचा पहिला टप्पा साजरा करत आहे. उर्मिलाच्या सगळ्याच कुटुंबाशी तिच्या युट्युब फॅमिलीची ओळख आहे. अगदी नवरा, भाऊ आणि नव्याने कुटुंबात एंट्री घेतलेला उर्मिलाचा लेक अथांग यांच्यावर उर्मिलाची चाहते मंडळी खूप प्रेम करत असतात. आज अथांगचा पहिला वाढदिवस साजरा करताना उर्मिला तिचा नवा जन्म झाल्याचं इन्स्टाग्रामच्या नव्या पोस्टमध्ये लिहिते. तसंच आई झाल्यानंतर सुरु झालेल्या तिच्या फिटनेस जर्नीबद्दल सुद्धा ती लिहिताना म्हणते, “Back to my original weight! पुन्हा मुळ वजनावर! डावीकडे - मी pregnant होण्याआधीचा फोटो उजवीकडे - मी आई होऊन वर्ष पुर्ण झालं! आज एक वर्ष पुर्ण झालं मला आई होऊन, म्हणून आज माझाही वाढदिवसच! फक्त वजन मुळ आकड्यांवर आलंय, fitness च्या प्रवासाची मात्र आत्ता कुठे खरी सुरुवात झालीय! अजून मुळ stamina, flexibility, strength येणं बाकी आहे. स्वतःचा स्विकार करत, स्वतःवर प्रेम करत तोही प्रवास कष्टाचा तरीही आनंदाचाच असेल ♥️मला या प्रवासात काय शिकायला मिळालं? यावरचा व्हिडीओ तुमच्या भेटीला लवकरच येईल!” उर्मिला हि स्वतःबद्दल स्वतःच्या शरीराबद्दल कायमच जागरूक असल्याचं दिसून आलं आहे. आई होताना तिने प्रत्येक टप्प्यावर शरीरात होणारे बदल आनंदाने स्वीकारून त्याबद्दल असलेला गैरसमज सुद्धा दूर करायचं काम ती करत आली आहे. अनेकदा स्त्रियांना गर्भारपणात शरीरात होणारे बदल पचवणं जड जातं. आई झाल्यानंतर सुद्धा स्वतःच्या शरीराबद्दल त्यांना शंका कुशंका मनात येत असतात. उर्मिला तिच्या अनेक पोस्टमधून वारंवार याबद्दल व्यक्त होताना आणि अप्रत्यक्षपणे स्त्रियांना आधार देताना दिसली आहे. आई होणं हे खूप मोठं वरदान आहे असं सुद्धा तिने अनेकदा सांगितलं आहे.

जाहिरात

उर्मिलाचा लेक अथांग सुद्धा तिच्या चाहतेमंडळींमधला चर्चेचा विषय असतो. अथांगच्या आयुष्यात होणारे छोटे मोठे मजेदार अपडेट्स, त्याचे गोड व्हिडिओ ती नेहमीच शेअर करत आली आहे. उर्मिलाने काहीच दिवसांपूर्वी तिच्या भावासोबत मागचा वर्षी घडलेला अपघाताचा प्रसंग मोठ्या धीराने आपल्या प्रेक्षकांसोबत शेअर केला. त्यावर तिला चाहत्यांनी सपोर्ट करून या धाडसी कृतीसाठी तिचं कौतुकसुद्धा केलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात