मुंबई, 21 मे: सुख म्हणजे नक्की काय असतं (sukh mhanje nakki kay asta) मालिकेतील मॅडहेड अर्थात सर्वांची लाकडी देवकी (Devki) म्हणजेचअभिनेत्री मीनाक्षी राठोड (Meenakshi Rathod) नुकतीच आई झाली आहे. प्रेग्नंसीच्या काळातही मिनाक्षी 9 महिने मालिकेचं शुटींग करत होती. नवव्या महिन्यातही तिनं काम केलं. मिनाक्षीने काही दिवसांपूर्वीच एका चिमुकलीला जन्म दिला. मिनाक्षी आणि तिचा नवरा अभिनेता कैलाश वाघमारे (Kailash Waghmare) यांनी सोशल मीडियावर बाळाचा फोटो शेअर ही गुड न्यूज त्यांच्या चाहत्यांना दिली. आई बाबा झाल्यानंतर दोघेही अत्यंत आनंदात असून घरी आलेल्या चिमुकलीसोबत वेळ घालवत आहेत. अभिनेता कैलाश याचा भिरकीट (Bhirkit) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशनवेळी त्याने राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीत आपल्या मुलीचं आणि बायको मीनाक्षीचं कौतुक केलं. बाळाचं वर्णन करताना कैलाशला अश्रू अनावर झाले. कैलाश म्हणाला, ‘आई होण्याची संपूर्ण प्रक्रिया मीनाक्षीने एंजॉय केली. जेव्हा पासून आम्हाला कळलं की बाळ होणार तेव्हा पासून आम्ही फार उत्साही होतो. पण आता बाळ झाल्यापासून आमचं आयुष्य फार बदललं आहे. मी सतत मीनाक्षीसोबत असतो. आम्ही दोघेही सकाळी 7 वाजता झोपतो. पण आम्हाला अजिबात वाटत नाही की आम्ही रात्रभर जागतो. उलट मी मीनाक्षीचं कौतुक करतो की तिचे सी सेक्शन (सिझेरीयन) झाले असले तरी बाळाची आणि स्वत:ची सगळी कामं करते. तिला कितीही दुखत असलं तरीही ती बाळासाठी सगळं काही करते’. हेही वाचा - Hruta Durgule Wedding: लग्नाला न आल्याने ह्रताच्या सासूने भरला अंजिक्यला दम, म्हणाल्या आता…
सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्रींना आई झाल्यावर आपला बॉडी साईज बदलेल. स्तनपान करण्यासही अनेक जणी नाही म्हणतात, यावर बोलताना कैलाश म्हणाला, ‘मीनाक्षी बाळाचं सगळं करते. तिच्या शरिराचा आकार बिघडेल किंवा काही होईल याची तिला अजिबात चिंता नाही. ती बाळाला स्तनपान करते त्याची सगळी काळजी घेते. त्यामुळे मीनाक्षीचं मला फार कौतुक वाटतं. ती माझी बायको असल्याचा मला अभिमान वाटतो’. बाळ माझ्या आईसारखं दिसतं माझ्या आईसोबत माझं वेगळं नात होतं. ती मला सोडून गेल्या नंतर तिची उणीव मला सतत जाणवायला लागली. आम्हाला मुलगी झाली आणि मुलगी हुबेहुब माझ्या आईसारखी दिसते. मी जेव्हा पहिल्यांदा मुलीला पाहिलं तेव्हा मला तिचा चेहरा वेगळा वाटला. मी ओळखू शकलो नाही.मला वाटत होतं की हा चेहरा मी आधीही पाहिलाय. तेव्हा माझी सासू मला म्हणाली तुमची आई परत आलीय. ‘माय गोड गोजिरी होऊन परत आली’, असे म्हणत कैलाश भावूक झाला.