मुंबई, 29 एप्रिल- बॉलीवूड अभिनेत्री (Bollywood Actress) कंगना रनौत(Kangna Ranaut) सतत आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असते. कंगना सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. फक्त सक्रीयचं नसते, तर देशापासून विदेशांपर्यंत सर्व मुद्द्यांवर आपलं मत व्यक्त करत असते. त्यामुळे ती अनेक वेळा सोशल मीडियावर ट्रोलसुद्धा होते (Kangana troll On social Media) असते. मात्र कंगनाला ट्रोलर्सचा अजिबात फरक पडत नाही. हे तिच्या प्रत्येक पोस्टमध्ये दिसून येतं. आता कंगना रनौत कोरोना लसीकरणासंदर्भात (Corona Vaccination) लोकांना जागृत करताना दिसून येत आहे.
View this post on Instagram
नुकताच कंगनाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. आणि या व्हिडीओमध्ये ती म्हणत आहे. ‘कोरोना वायरसमुळे मोठ्या प्रमाणात लोक निगेटिव्ह विचार करत आहेत. मात्र ही वेळ निगेटिव्ह विचार करण्याची नव्हे, तर कोरोना लस घेऊन पॉजिटीव्ह राहण्याची आहे. याचबरोबर कंगनाने लसीकरणाचे फायदे देखील सांगितले आहेत. तसेच लवकरच आपल्या कर्मचाऱ्यांना आणि कुटुंबाचंसुद्धा कोरोना लसीकरण करणार असल्याचं सांगितलं आहे.
मात्र या व्हिडीओमध्ये कंगनाने गडबडीत अशा काही गोष्टी म्हटल्या आहेत. ज्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल व्हावं लागत आहे. कंगनाने यामध्ये देशाला सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश म्हटलं आहे. त्याचबरोबर तिने ‘Covid 19 Vaccine’ ला औषध म्हणून संबोधल आहे. आणि कोरोनाच्या प्रसारासाठी आपली लोकसंख्याचं कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे काही युजर्सनी कंगनाला ट्रोल करत म्हटलं आहे, ‘जर यासाठी लोकसंख्याचं कारणीभूत आहे, तर मग राजकीय मोर्चे आणि कुंभमेळा थांबवण्यासाठी व्हिडीओ का नाही शेयर केलीस’.
(हे वाचा:पोकळ बडबड थांबव अन् ऑक्सिजन पुरव’; राखी सावंतनं घेतला कंगनाशी पंगा )
याआधी सुद्धा कंगना ऑक्सिजन बाबतीत सरकारची पाठराखण केल्यामुळे ट्रोल झाली होती. मात्र त्रासलेल्या जनतेपुढे सरकारची पाठराखण करणं कंगनाला चांगलचं महाग पडलं होतं. कंगनाने ट्वीट करत म्हटलं होतं, ‘तुम्हाला समजत असेल तर सत्य समजा, मोठीं लोकसंख्या, अशिक्षित, गरीब आणि गुंतागुंतीच्या या देशाला सांभाळणं सोपं नाहीय. प्रत्येकजण आपला उत्तम देण्याचा प्रयत्न करत आहे. नुकसान भरपाई तर नाही होऊ शकत मात्र तुम्ही आभार मानायला हवे जो तुमच्यासाठी प्रत्येकवेळी उपस्थित असतो’. या वक्तव्यांमुळे सुद्धा कंगना बरीच ट्रोल झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Corona vaccine, Covid-19, Entertainment, Kangana ranaut