मुंबई, 13 एप्रिल : अलिकडेच दिग्दर्शनाकडे वळलेला अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक (Prasad Oak) लवकरच एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गुढीपाडव्याच्या (Gudipadawa) मुहूर्तावर या नव्या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. प्लॅनेट मराठी (Planet Marathi) आणि अजय बर्डापूरकर यांची निर्मिती असलेला ‘चंद्रमुखी’ (Chandramukhi) हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. (marathi movie Chnadramukhi teaser launch) हाय काय नाय काय, कच्चा लिंबू (kaccha limbu), हिरकणी (Hirakani) अशा उत्कृष्ट चित्रपटांच दिग्दर्शन प्रसाद ओक याने केलं आहे. तर कच्चा लिंबू या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला आहे. यानंतर चंद्रमुखी हा नवा चित्रपट येत असल्याने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
प्रसिद्ध गायक, संगीतकार अजय- अतुल (Ajay – Atul) हे चित्रपटाचं संगीत संयोजन करणार आहेत. तसंच लेखक, अभिनेता चिन्मय मांडलेकर चित्रपटाची पटकथा , संवाद लेखन करणार आहे. नुकताच चित्रपटाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. पण अद्यापही चित्रपटाची संपूर्ण स्टारकास्ट, कलाकार हे गुलद्स्त्यातच आहे. त्यामुळे मुख्य कालाकार नक्की कोण असणार हे अद्याप समजलेलं नाही. टिझर मध्ये सुरुवातीला घुंगरांचा आवाज येत आहे आणि एक व्यक्ती चालताना दिसते आहे. हे वाचा - माधुरी दीक्षितला आठवला बालपणीचा ‘गुढीपाडवा’; शुभदिनी केली अशी प्रार्थना प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील (Vishwas Patil) यांच्या कादंबरीवर हा चित्रपट आधारीत असणार आहे. येत्या दिवाळीत 5 नोव्हेंबर 2021 ला चित्रपट चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक याचा मागील चित्रपट हिरकणी प्रचंड लोकप्रिय ठरला होता. चित्रपटाला अनेक नामांकन तसंच पुरस्कारही मिळाले होते. तसंच अनेक चित्रपट, नाटक आणि मालिकांमध्येही प्रसाद ने काम केलं आहे. तर आता दिग्दर्शनामध्ये तो जास्तीत जास्त काम करताना दिसत आहे.