मुंबई, 22 डिसेंबर : बॉलिवूडकरांसाठी यंदाचं वर्ष खूपच खास ठरलं आहे. कुणाचं लग्न झालं तर कुणाच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं. एकंदरीतच या वर्षात सगळीकडे आनंदी आनंद राहीला. चित्रपटसृष्टीतील अनेक जोडप्यांनी यंदाच्या वर्षी गुडन्यूज दिली आहे. आलिया, सोनम, प्रियांका या आघाडीच्या अभिनेत्रींच्या घरी चिमुकल्यांचं आगमन झालं. तर छोट्या पडद्यावरच्या अभिनेत्यांनी सुद्धा आपल्या घरात मुलांचं स्वागत केलं. नुकतंच बॉलिवूड अभिनेता हरमन बावेजानेही गुडन्यूज शेअर केली आहे. 'लव्ह स्टोरी 2050' फेम अभिनेता हरमन बावेजाच्या घरी चिमुकल्याचे आगमन झाले आहे. आता त्यापाठोपाठ टीव्ही अभिनेता अयाज खान देखील बाबा झाला आहे.
अभिनेता अयाज खान हे छोट्या आणि मोठ्या पडद्यावरचे एक प्रसिद्ध नाव आहे. तो अनेक चित्रपट आणि टीव्ही शोमध्ये दिसला आहे. सध्या तो अभिनय जगतापासून दूर असला तरी सोशल मीडियावर चाहत्यांसह आनंदाचे क्षण शेअर करायला तो विसरत नाही. नुकताच तो बाबा झाला असून त्याची घोषणा अभिनेत्याने सोशल मीडियावर केली आहे. सध्या त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय.
हेही वाचा - Harman Baweja : आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याच्या घरी चिमुकल्याचं आगमन, शुभेच्छांचा होतोय वर्षाव
अयाज खानने 2018 साली लखनौ येथील रहिवासी जन्नत खानशी लग्न केले. त्यांच्या लग्नाला 4 वर्षे झाली असून आता या जोडप्याच्या आयुष्यात आनंदाचे क्षण आले आहेत. त्यांनी त्यांच्या घरी चिमुकल्याचे स्वागत केले आहे. 21 डिसेंबर 2022 रोजी अयाजने मुलीचा पहिला फोटो शेअर केला आणि तिचे नावही सांगितले. शेअर केलेल्या फोटोमध्ये मुलीचा चेहरा दिसत नाही. या दोघांची छोटी परी पिंक कलर आणि व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.
View this post on Instagram
अयाज खानने या फोटोसोबत मुलीचे नाव सांगितले आहे. अयाज खानने कॅप्शनमध्ये लिहिले की, "प्रार्थना पूर्ण होतात. 21.12.22, अल्लाहने आम्हाला आमच्या लहान मुली दुआ हुसैन खानच्या जन्माने आशीर्वाद दिला." 43 वर्षीय अयाज आणि त्याची पत्नी जन्नत आई-वडील झाल्याचा आनंद शेअर करताच सेलिब्रिटींनी त्यांचे अभिनंदन केले. त्यांचे आई-वडील झाल्यामुळे चाहतेही खूप खूश आहेत.
अयाज खानच्या मुलीच्या जन्मावर बिपाशा बसूनेही एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे. तिने दुआचा एक फोटो शेअर केला आहे, तसेच एक क्यूट नोटही लिहिली आहे. कॅप्शनमध्ये बिपाशा म्हणाली, 'दुआ आमचे जीवन प्रेम आणि आनंदाने भरण्यासाठी ती येथे आली आहे. माझ्या प्रिय जन्नत आणि अयाझचे अभिनंदन. देवी दुआला पाहण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहे.'
12 नोव्हेंबर 2022 रोजी बिपाशा बसू आणि करण सिंह ग्रोवर देखील एका मुलीचे आई-बाबा झाले आहेत. या जोडप्याने आपल्या मुलीचे नाव देवी ठेवले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bipasha basu, Bollywood actor, Bollywood News, Entertainment