Amitabh Bachchan Health: बिग बी यांची तब्येत बिघडली, शस्त्रक्रियेबद्दल दिली माहिती

Amitabh Bachchan Health: बिग बी यांची तब्येत बिघडली, शस्त्रक्रियेबद्दल दिली माहिती

अमिताभ यांच्या एका ब्लॉगनं (Amitabh Bachchan Blog) आता चाहत्यांना धक्का बसला आहे. अमिताभ यांच्या ब्लॉगमधून हे समोर आलं आहे, की त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना सर्जरी (Surgery) करावी लागणार आहे.

  • Share this:

मुंबई 28 फेब्रुवारी : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचे अनेक चाहते आहेत. त्यांची एक झलक पाहाण्यासाठीही चाहते आतुरतेनं वाट पाहात असतात. सोशल मीडियावरही बिग बी (Big B) सक्रीय असतात आणि आपले अनेक अनुभव ते ब्लॉगच्या माध्यमातून शेअर करत असतात. मात्र, अमिताभ यांच्या एका ब्लॉगनं (Amitabh Bachchan Blog) आता चाहत्यांना धक्का बसला आहे. अमिताभ यांच्या ब्लॉगमधून हे समोर आलं आहे, की त्यांची प्रकृती खालावली असून त्यांना सर्जरी (Surgery) करावी लागणार आहे.

अमिताभ यांनी आपल्या सर्जरीविषयीची माहिती आपल्या ब्लॉगमधून शनिवारी दिली आहे. त्यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे, 'मेडिकल कंडिशन...सर्जरी...मी लिहू शकत नाही, एबी'. अमिताभ यांचा हा ब्लॉग पाहिल्यानंतर चाहतेही चिंतेत पडले आहेत. अमिताभ ब्लॉगच्या माध्यमातून चाहत्यांना दररोजची माहिती देत असतात. मात्र, आता त्यांच्या या छोट्याशा वाक्यानं चाहत्यांना चिंतेत टाकलं आहे. कारण नेमकी कसली सर्जरी आहे. ती कधी आणि कुठे केली जाणार आहे, या गोष्टीची माहिती कोणालाच अजूनही समजली नाही. सर्जरी झाली आहे, की होणार आहे हेदेखील सांगितलं जाऊ शकत नाही. मात्र, आता चाहते त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. लोक सतत कमेंट करुन त्यांच्या प्रकृतीबद्दल विचारपूस करत आहेत.

अमिताभ यांना अचानक असं काय झालं? त्यांना सर्जरी कशासाठी करावी लागत आहे, असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. त्यांनी ट्वीट करत म्हटलं आहे, की काही गोष्टी गरजेपेक्षा जास्त वाढल्या आहेत. काही कापल्यानंतर सुधारणा आहे. जीवनाच्या काळातील उद्यासाठी आहे हे. उद्या समजेल की हे कसं राहाणार. अमिताभ यांनी थेट कोणतीही माहिती दिली नसल्यानं चाहते विचारात पडले आहेत.

Published by: Kiran Pharate
First published: February 28, 2021, 9:05 AM IST

ताज्या बातम्या