मुंबई 14 ऑगस्ट: अभिजित खांडकेकर हा अभिनेता अनेक भूमिकांमध्ये आजवर दिसून आला आहे. येत्या काळात हा अभिनेता एका थ्रिलर वेबसिरीजमध्ये बघायला मिळणार आहे. अभिजित येत्या काळात ‘दुरंगा’ नावाच्या वेबसिरीजमध्ये अभिनय करताना दिसणार आहे. ही वेबसिरीज एका कोरियन वेबसिरीजचं भारतीय रूपांतरण आहे. यामध्ये अभिजीतची भूमिका एकदम हटके असणार आहे. यासंबंधी स्वतः अभिजीतने (abhijeet khandkekar new web series) सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. वेबसिरीजची छोटीशी झलक सुद्धा बघायला मिळत आहे. यामध्ये गुलशन देवैय्या, दृष्टी धामी यांच्या मुख्य भूमिका आहेत. ‘दुरंगा’ वेबसीरिजचं कथानक सस्पेन्स थ्रिलर आहे. यामध्ये एक किलर शहरात अनेक निघृण हत्या करत फिरताना दाखवला आहे. यामध्ये गुलनशी भूमिका थरकाप उडवणारी असल्याचं समोर आलं आहे. तर अभिजीतची भूमिका सुद्धा अगदी खिळवून ठेवणारी असणार असा पक्का संकेत मिळत आहे.
अभिजीतच्या बायकोने म्हणजे अभिनेत्री सुखदा खांडकेकरने सुद्धा नवऱ्यासाठी पोस्ट शेअर करत त्याच कौतुक केलं आहे. “मी या क्षणासाठी थांबले होते आणि आता तो समोर आल्यावर काय रिऍक्ट व्हावं समज नाहीये. अभिजीत तुला ते माझ्या डोळ्यात दिसेलच. ऑल द बेस्ट फॉर ‘दुरंगा’.” असं सुखदाने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
‘दुरंगा’ वेबसीरीज हि फ्लॉवर ऑफ एव्हिल या कोरियन वेबसिरीजच भारतीय रूपांतरण आहे. सिरीजचा पहिला लुक एकदम विलक्षण असून त्याची झलक प्रेक्षकांना चकित करणारी आहे. हे ही वाचा- Amruta Khanvilkar: ‘मला तुला खूप काही सांगायचं होतं सगळंच राहून गेलं’; अमृताच्या आयुष्यातील जवळच्या व्यक्तीचं निधन सध्या अभिजीत वर्क फ्रंटवर वेगवेगळ्या भूमिकांमध्ये स्वतःला अजमावून बघताना दिसत आहे. सध्या हा अभिनेता तुझेच मी गीत गात आहे नावाच्या मालिकेत दिसून येत आहे. यामध्ये तो एका गायकीची भूमिका साकारत आहे. सध्या ही मालिका सुद्धा प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यात यशस्वी होत आहे. मालिकेला खूप छान प्रतिसाद मिळताना दिसत आहे. याआधी सुद्धा अभिजित गुरुनाथ या पत्रामुळे लोकप्रिय झाला होता.