मुंबई, 9 नोव्हेंबर: प्रसिद्ध सिनेअभिनेत्री आलिया भटला काल कन्यारत्न प्राप्त झालं. साहजिकच ती तिच्या मुलीला कोणतं नाव ठेवायचं याचा विचार करत असेल. आता आपल्या मुलीचं नाव काय ठेवावं हा विचार फक्त आलियालाच पडला असेल असं नाही. हा विचार आपल्यालाही पडतो. मुलगी झाली की तिचं नाव काय ठेवायचं याचा आपण विचार करतो. आपल्या मुलीचं नाव युनिक असावं, असा आपला हट्ट असतो. यासाठी आपण मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्याशी चर्चा करतो. त्यांनी सुचवलेली नावंही पटली नाहीत, तर मग आपण इंटरनेटवर शोधाशोध करतो. पण बहुधा तेथील नावंही आपल्याला पसंत पडत नाहीत. मग आपण टीव्ही, सिनेमा यावरील कलाकारांच्या पात्रांची नावं पाहतो आणि त्यानुसार ती आपल्या मुलांना ठेवतो. पण काही काळानं ही नावंही जुनी वाटू लागतात. म्हणूनच आपल्या मुलीला सुंदर नाव असावं, त्या नावाचा अर्थही चांगला असावा, तसेच ते नेहमी कालसुसंगत वाटावं अशी आपली इच्छा असते. तुमची मदत व्हावी म्हणून आज आम्ही मुलींना ठेवण्याजोग्या काही नावांची यादी तुम्हाला सांगणार आहोत.
मुलींची नावे | अर्थ |
---|---|
अर्जा | राजकन्या, पवित्र |
परी | लोभस कन्या, राजकन्या |
कायरा | सूर्यासारखी, राजकन्या |
आर्या | देवी, देवीचे नाव |
अमायरा | राजकन्या, सुंदर |
तान्या | सुंदर राजकन्या, नाजूक |
आकृती | आकार |
आयुक्ता | राजाची मुलगी, राजकन्या |
मलिहा | खंबीर मनाची, सुंदर, सौंदर्यवती |
साजिरी | सुंदर, कोमल |
साक्षी | एखाद्याच्या चांगल्या वाईटासाठी साक्षीदार असणे |
समायरा | सुंदर, राजकन्या |
आख्या | प्रसिद्धी |
आरष्टी | पवित्र |
अधिश्री | प्रमुख, प्राधान्य |
अमोली | मौल्यवान, अमूल्य |
अनिका | दुर्गेचे रूप, देवी दुर्गा |
अनिशा | न संपणारी, सतत कार्यरत असणारी |
दक्षा | पार्वतीचे नाव, जमीन, भगवान शिवाची पत्नी |
दृष्टी | बघण्याची ताकद, आनंद, दृष्टीकोन, साहस |
इलाक्षी | सुंदर डोळ्यांची, नयनाक्षी |
गणिका | सुंदर फुल |
लावण्या | सुंदर, सौंदर्यवती, सुंदर दिसणारी |
संजिता | बासरी |
शैली | सवय, स्टाईल |
वार्या | स्वरूप, एखाद्या गोष्टीचा आराखडा |
वामिका | योद्धा, युद्धात लढणारी |
देविषा | देवीप्रमाणे, देवी, देवीचे रूप |
चित्राणी | गंगेचे नाव, गंगेचे रूप, गंगा नदी |
अर्णवी | पक्षी, जगाची सुरूवात |
कशिका | निसर्गाशी जोडली गेलेली व्यक्ती |
मिष्का | प्रेमाचे प्रतीक, प्रेमाने दिलेले बक्षीस |
निद्रा | झोप, प्रेम |
पिहू | पक्षांची किलबिल |
पावनी | संपूर्ण चंद्र, पूर्ण चंद्राचा चेहरा |
नेयसा | पवित्र |
नित्या | नियमित, नेहमीचे |
नव्या | नवीन, तरूण, नवे |
नाएशा | विशेष असणारी, नवी |
ओमिषा | आयुष्याची देवी, जीवनमरणाची देवी |
Marathi Names For Girl