Ratris Khel Chale… शेवंता आली आता वच्छीची सून शोभा कधी येणार?
रात्रीस खेळ चालेमधील वच्छीची सून सध्या काय करतेय?
|
1/ 10
रात्रीस खेळ चाले (Ratris Khel Chale) या सुपरहिट मालिकेच्या दुसऱ्या पर्वात शोभा ही व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री मंगल राणेचा (Mangal Rane) आज वाढदिवस आहे.
2/ 10
वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातील चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
3/ 10
रात्रीस खेळ चाले ही छोट्या पडद्यावरील सध्याच्या सर्वाधिक लोकप्रिय मालिकांपैकी एक म्हणून चर्चेत असते. या मालिकेचं सध्या तीसरं पर्व सुरु आहे.
4/ 10
मात्र या सीझनमध्ये वच्छीची सून शोभाची एण्ट्री अद्याप झालेली नाही.
5/ 10
खरं तर दुसऱ्या सीझनमध्ये शोभाचा मृत्यू झाला होता पण त्या सीझनमधील काही कलाकार अतृप्त आत्म्यांच्या रुपात तीसऱ्या झीनमध्ये झळकताना दिसत आहेत.
6/ 10
त्यामुळं शोभाची एण्ट्री कधी होणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.
7/ 10
दरम्यान मंगल मालिकेत सक्रिय नसली तरी ती रंगभूमीवर मात्र काम करत आहे. अनेक प्रायोगिक रंगभूमीवर काम करुन सध्या ती अभिनयाचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेत आहे.
8/ 10
मंगलंनं गाव गाता गजाली आणि अनेक पारितोषिक पटकावणाऱ्या 'रेडू' या चित्रपटातही महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
9/ 10
रुपेरी पडद्यावर गांवढळ रुपात झळकणारी मंगल खऱ्या आयुष्यात मात्र खुपच मॉर्डन आहे. सोशल मीडियाद्वारे ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.
10/ 10
सोशल मीडियावरील तिचे फोटो पाहून नक्की ही तिच शोभा आहे का? असा प्रश्न वारंवार तिचे चाहते विचारताना दिसतात.