मुंबई, 12 सप्टेंबर : मराठी टेलिव्हिजनचा लोकप्रिय चेहरा असलेला अभिनेता आस्ताद काळे सध्या चर्चेत आला आहे. आस्ताद त्याच्या स्पष्टवक्तेपणामुळे कायमचं चर्चेत असतो. बिग बॉसच्या मराठीच्या घरातही आस्तादचा स्पष्टवक्तेपणा प्रेक्षकांना पाहायला मिळाला आहे. आपली ठोस आणि ठाम मतं तो नेहमी व्यक्त करत असतो. यावेळी देखील आस्तादनं स्पष्टमत मांडलं आहे मात्र त्यामुळे चांगलीच चर्चा रंगली आहे. आस्तादनं झी मराठी या वाहिनी आणि त्यावर सुरू असलेल्या लोकप्रिय मालिकेवर आणि त्यातील कलाकारांवर निशाणा साधला आहे. अभिनेत्याच्या अभिनयाबद्दल आस्तादनं फेसबुक पोस्ट लिहित स्पष्ट मतं मांडलं आहे. आस्तादनं फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्यानं म्हटलं आहे की, ‘झी मराठीवरील एका मालिकेतील त्या एका नटानी साकारलेल्या पात्राच्या वाक्यांपुरता सबटाइटलची सोय करा. काय बोलतो शष्प कळत नाही. मी ती मालिका बघत नाही. काल माझ्या आईनी लावली होती तेव्हा तीमधले एक दोन प्रसंद भोगले’. हेही वाचा - KBC 14: साप पाहून अमिताभ बच्चन यांच्यासोबत घडते विचित्र गोष्ट, बिग बींनी उघड केलं गुपित
अस्तादनं मालिकेचं नाव घेतला मालिकेवर आणि त्यातील कलाकारांवर निशाणा साधला आहे. त्यांच्या अभिनयावरुन चांगलीच चपराक दिली आहे. आस्तादच्या या पोस्टवर आस्ताद जरी काही बोलला नसला तरी नेटकऱ्यांनी मात्र ही मालिका कोणती आहे ते बरोबर ओळखलं आहे. अभिनेत्याच्या पोस्टवर कमेंट्स करत नेटकऱ्यांनी झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका असल्यांचं म्हटलं आहे.
तू तेव्हा तशी मालिकेत अनामिकाच्या नवऱ्याची म्हणजेच आकाशची एंट्री झाली आहे. अभिनेते अशोक समर्थ यांच्याविषयी आस्ताद बोलत असल्याचं त्याच्या पोस्टवरून लक्षात येत आहे. ‘मालिकेतील आकाश तोंडातल्या तोंडात बोलतो’, असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. ‘त्याचे संवाद नीट ऐकून येत नाही’, ‘टीव्हीचा आवाज वाढवून बघितला तरीही काही कळत नाही’, असंही अनेकांनी म्हटलं आहे. आस्तादच्या या स्पष्टवक्तेपणामुळे तो पुन्हा चर्चेत आलाच आहे मात्र झी मराठीवरील मालिकांना प्रेक्षकांनी पुन्हा एकदा ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे.

)







