जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Aashish Bhardwaj: ती मारहाण करायची, धमकी द्यायची...' प्रसिद्ध अभिनेत्याचा पत्नीविषयी धक्कादायक खुलासा

Aashish Bhardwaj: ती मारहाण करायची, धमकी द्यायची...' प्रसिद्ध अभिनेत्याचा पत्नीविषयी धक्कादायक खुलासा

आशिष भारद्वाज

आशिष भारद्वाज

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आशिष भारद्वाजवर त्याची पत्नी काजल चोणकरने गंभीर आरोप केले आहेत. या अभिनेत्याच्या पत्नीने शारीरिक हिंसा, मानसिक छळ, यासारखे आरोप लावले आहेत. आता या संपूर्ण प्रकरणावर आशिष भारद्वाज याची बाजूही पुढे आली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 25 फेब्रुवारी: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आशिष भारद्वाजवर त्याची पत्नी काजल चोणकरने गंभीर आरोप केले आहेत. या अभिनेत्याच्या पत्नीने शारीरिक हिंसा, मानसिक छळ, यासारखे आरोप लावले आहेत. एवढेच नाही तर काजलने एफआयआरही दाखल केला आहे. यामध्ये तिने आशीषवर लग्नाचे आमिष दाखवून बलात्काराचा आरोपही केला आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर आशिष भारद्वाज याची बाजूही पुढे आली आहे. यासोबतच आशिषने लग्नात झालेल्या छळाची माहितीही पोलिसांना दिली आहे. काजलच्या म्हणण्यानुसार, ‘आशिष आणि मी जवळपास ३ वर्षे रिलेशनशिपमध्ये होतो. गेल्या वर्षी मी त्याला आई-वडिलांशी बोलायला सांगितले. आशिषने माझ्याशी लग्न करण्याचे वचन दिले होते. मी ‘मिठाई’ या शोदरम्यान गरोदर राहिले, त्यानंतर मी त्याला त्याच्या पालकांशी बोलण्यास सांगितले. मग आशिषने मला थोडा वेळ मागितला. तो बहाणा करत राहिला. यानंतर त्याने माझ्यावर जबरदस्ती करून गर्भपात करण्यास भाग पाडले. मी गर्भपात करून घेतला तेव्हा तो अचानक गायब झाला. आशिष माझ्याकडे दुर्लक्ष करू लागला. Dilip Joshi: तारक मेहताच्या जेठालालनं केली मुंबईच्या मेट्रोची सफर; चाहते म्हणाले ‘आता बबिताजींना…’ अभिनेत्रीचे म्हणणे आहे की, तिने गेल्या वर्षी ९ सप्टेंबरला आशिषविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. यानंतर त्याचे संपूर्ण कुटुंब त्याचे मन वळवण्यासाठी आले आणि त्याने आशिषसोबत कोर्ट मॅरेज केले. पण त्यानंतर तिचा छळ होऊ लागला. काजल सांगते की, केवळ लग्नाचे नाटक रचले गेले. काजलने आशिषवर शारीरिक आणि मानसिक शोषणाचा आरोप केला आहे. तसेच आशिषचे कुटुंबीय या लग्नाला नकार देत असल्याचेही तिने म्हटले आहे.

जाहिरात

आता यावर अभिनेता आशिष भारद्वाजची बाजू देखील समोर आली आहे. ‘ईटाईम्स’शी बोलताना त्याने काजलने केलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचे सांगितले आहे. त्याने उलट तिच्यावर आरोप करत म्हटलंय कि, ‘मी कामावर जाण्याआधी मुद्दामहून ती माझ्या चेहऱ्यावर ओरखडे ओढायची, मला त्रास द्यायची. जेव्हा कधी मला कामासाठी फोन आला किंवा बाहेर जावे लागले तेव्हा ती मला पोलिस केसची धमकी द्यायची. '

News18लोकमत
News18लोकमत

एवढंच नाही तर या अभिनेत्याने पत्नी त्याला मारहाण करायची, तिने सगळे कॉन्टॅक्ट डिलीट केले आहेत, त्याचे सोशल मीडिया अकाउंट हॅक केले आहेत. तसेच ती माझं करियर संपवण्याची धमकी द्यायची असा खुलासा देखील केला आहे. तसेच ती घटस्फोट घेण्यासाठी 75 लाख रुपयांची मागणी करत असल्याचेही सांगितले आहे.आता या प्रकरणात कोण खरं कोण खोटं हे समोर आलं नाहीये, त्यामुळे हे प्रकरण नक्की कोणतं वळण घेणार ते पाहणं महत्वाचं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात