• Home
  • »
  • News
  • »
  • entertainment
  • »
  • ...आणि ऐश्वर्याची लेक आराध्या बच्चनने बाबा म्हणून अभिषेकऐवजी रणबीर कपूरलाच मारली मिठी

...आणि ऐश्वर्याची लेक आराध्या बच्चनने बाबा म्हणून अभिषेकऐवजी रणबीर कपूरलाच मारली मिठी

आराध्याने बाबा म्हणून रणबीरला मिठी मारली तेव्हा अभिषेकने...

  • Share this:
मुंबई, 28 जुलै : आराध्या बच्चन (Aaradhya Bachchan) म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai-Bachchan) आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांची मुलगी. पण एकदा आराध्याने चक्क बाबा म्हणून अभिषेक नव्हे तर रणबीर कपूरलाच (Ranbir Kapoor) मिठी मारली होती. 2016 मध्ये 'ऐ दिल है मुश्कील' (Ai Dil Hai Mushkil) या सिनेमात रणबीर कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन एकत्र दिसले. या सिनेमाच्या शूटिंगवेळी आराध्या ऐश्वर्यासोबत होती. तेव्हा तिने बाबा म्हणून रणबीरलाच मिठी (Aaradhya Bachchan hug Ranbir Kapoor as dad)  मारली. 'फिल्मफेअर' मासिकाला दिलेल्या एका जुन्या मुलाखतीत ऐश्वर्या राय-बच्चनने हा किस्सा सांगितला होता. ऐश्वर्याने सांगितलं, "एके दिवशी आराध्याने रणबीरला ते आपले वडीलच आहेत, असं समजून मिठी मारली. तेव्हा तोही आश्चर्यचकित झाला होता. पण त्या वेळी आराध्याचा नेमका काय गोंधळ झाला असावा याची मला कल्पना आली. कारण त्याने अभिषेकसारखं जॅकेट आणि कॅप परिधान केली होती. मी आराध्याला विचारलं, तेव्हा तिने तेच सांगितलं." हे वाचा - आलिया करतेय रणबीरला मिस; बॉयफ्रेंडच्या आठवणीत पाहा अभिनेत्रीने काय केलं एकसारखी अंगकाठी असणं आणि त्यात सारखे दिसणारे कपडे घातलेले असणं यांमुळे एखाद्या व्यक्तीला पाठमोरं पाहिल्यावर त्या व्यक्तीला ओळखणं अशक्य होतं आणि हेच आराध्याबाबतीत घडलं. रणबीने अशी कॅप आणि जॅकेट घातलं होतं, की त्यामुळे आराध्या चुकून त्यालाच आपले बाबा (अभिषेक बच्चन) समजली. नंतर तिला आपली झालेली गंमत कळली होती. "तेव्हापासून आराध्या रणबीरच्या जवळपास थोडी लाजूनच वावरते. रणबीरचे वडील ऋषी कपूर यांच्यावर माझा क्रश होता आणि आता आराध्या रणबीरपाशी लाजून वावरते आहे. म्हणजे एक वर्तुळ पूर्ण झालं आहे", असं ऐश्वर्या म्हणाली. "आराध्याने चुकून मिठी मारल्यानंतर अभिषेकनेही रणबीरची चेष्टामस्करी केली होती. हे खूपच मजेशीर असल्याचं मी रणबीरला सांगितलं होतं सेटवर मी तिला त्याची ओळख 'रणबीर अंकल' अशी करून दिली होती. तेव्हा त्याने 'RK' अशी ओळख सांगितली होती. त्या दिवशी दोनदा तिने रणबीरला अंकल म्हणून हाक मारली. पण दुसऱ्या दिवशी अचानक तिने त्याला 'RK'या नावाने हाक मारली. तेव्हा आम्ही सगळे हसलो होतो", असंही ऐश्वर्याने सांगितलं. हे वाचा - EXCLUSIVE: लग्नाशिवाय आयुष्य नाही, असं काही नसतं : मुक्ता बर्वे ऐश्वर्या आता मणिरत्नम यांच्या पोन्नियिन सेल्व्हन (Ponniyin Selvan) या सिनेमात दिसणार आहे. तामिळनाडू सरकारने लॉकडाऊनचे निर्बंध थोडे शिथील केल्यानंतर सिनेमाचं शूटिंग सुरू झालं आहे. नुकतीच तिने या सिनेमातला सहकलाकार शरदकुमार याची भेट घेतली.
First published: