मुंबई, 2 मे : सोनी टीव्ही वरील सर्वाधिक चर्चेत असलेला रिअलिटी शो ‘कौन बनेगा करोडपती’च्या 11व्या सीझनचा पहिला प्रश्न अमिताभ बच्चन यांनी प्रेक्षकांना सांगितला आहे. एका व्हिडिओद्वारे हा प्रश्न विचारण्यात आला असून या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊन मगच तुम्ही या शोसाठीच्या रजिस्ट्रेशन प्रक्रियेची सुरुवात करू शकता. सोनी टीव्हीच्या व्हेरिफाइड ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला असून या व्हिडिओद्वारे अमिताभ बच्चन प्रेक्षकांना प्रश्न विचारताना दिसत आहेत. अमिताभ यांनी ‘संस्कृतमधून आलेल्या या नावांपैकी कोणत्या नावाचा अर्थ स्वागत करणे असा आहे?’ हा प्रश्न विचारला आहे आणि यासाठी A)नचिकेत B)अभिनंदन C)नरेंद्र D)महेंद्र असे चार पर्याय देण्यात आले आहेत.
Ab aapke aur Hot Seat ke beech mein na hogi duri, kyunki shuru ho gaye hai iss saal ke #KBC Registrations. Yeh raha iss saal ke registrations ka pehla sawaal. Register karne ke liye download kariye @SonyLIV app. pic.twitter.com/QPkY0nRGls
— sonytv (@SonyTV) May 1, 2019
ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट करताना सोनी टीव्हीनं कॅप्शनमध्ये लिहिलं, ‘आता तुम्ही आणि हॉट सीटमध्ये अजिबात अंतर राहणार नाही. कारण आजपासून केसीबीचं रजिस्ट्रेशन सुरू झालं आहे. हा आहे तुमचा पहिला प्रश्न. रजिस्टर करण्यासाठी सोनी लिव्ह अॅप डाउनलोड करा.’ जर तुम्हाला या प्रश्नाचं अचूक उत्तर माहीत असेल तर तुम्हाला SMSच्या सहाय्यानं हे द्यायचं आहे. किंवा तुम्ही सोनी लिव्ह अॅप्लिकेशनद्वारे या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. India’s Most Wanted Trailer- मलायकाच्या प्रेमात आकंठ बुडालेला अर्जुन कपूर जेव्हा देशासाठी जीवही द्यायला तयार होतो SMS द्वारे असं द्या उत्तर- SMSद्वारे या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी युजर्सना, त्याच्या SMSमध्ये KBC असं लिहायचं आहे आणि स्पेस देऊन तुमचं वय लिहायचं आहे. त्यानंतर आणखी एक स्पेस देऊन तुम्हाला तुमचं लिंग ( स्त्री/पुरुष) लिहायचं आहे. जर तुमचं वय 25 वर्षांचे पुरुष आहात तर तुम्हाला KBC 25 M असं लिहायचं आहे आणि हा मेसेज 509093 या नंबरवर पाठवायचा आहे. मतदान न करण्याच्या प्रश्नावर भडकला अक्षय कुमार, दिलं ‘हे’ उत्तर सोनी लिव्ह अॅप्लिकेशनद्वारे कसं द्याल उत्तर अॅप्लिकेशनद्वारे उत्तर देण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला फोनमध्ये अॅप इन्स्टॉल करायचं आहे. यानंतर केबीसीच्या रजिस्ट्रेशनसाठी दिलेल्या पर्यायावर जाऊन तिथे विचारलेली सर्व माहिती भरायची आहे. त्यांनंतर त्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊन तुम्ही या रजिस्ट्रेशन प्रक्रियेत भाग घेऊ शकता. अंतिम वेळ गुरुवारी रात्री 9 वाजेपर्यंत या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी गुरुवार रात्री पर्यंतचा वेळ देण्यात आला आहे. यानंतर दिलेली उत्तरं बाद ठरवण्यात येतील. जर तुम्हाला ‘कौन बनेगा करोडपति’मध्ये भाग घ्यायचा असेल तर तर या प्रश्नाचं अचूक उत्तरच तुम्हाला हॉट सीट पर्यंत पोहोचवू शकतं. Viral होतेय प्रियांका चोप्रा आणि निक जोनसची पब्लिक किस