मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /VIDEO: सेल्फी घेण्यासाठी चाहत्याने शाहरुखसोबत केलं असं काही; भडकला अभिनेता, आर्यनने केलं शांत

VIDEO: सेल्फी घेण्यासाठी चाहत्याने शाहरुखसोबत केलं असं काही; भडकला अभिनेता, आर्यनने केलं शांत

अभिनेत्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

अभिनेत्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

अभिनेत्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

मुंबई, 8 ऑगस्ट-   सेलिब्रेटी आणि चाहते यांचं एक खास नातं असतं. चाहते आपल्या आवडत्या कलाकाराला प्रत्यक्षात पाहण्यासाठी आणि त्यांच्यासोबत एक सेल्फी घेण्यासाठी प्रचंड उत्सुक असतात. सेलिब्रेटीसुद्धा आपल्या चाहत्यांना मनमोकळेपणाने भेटतात. परंतु बऱ्याच वेळा सेल्फी मिळवण्यासाठी चाहते असं काही करतात की सेलिब्रेटीसुद्धा अस्वस्थ होतात. असच काहीसं बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानसोबतसुद्धा झालं आहे. अभिनेत्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

शाहरुख खानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये शाहरुख आपली दोन्ही मुले आर्यन खान आणि अबराम खानसोबत एयरपोर्टवर दिसून येत आहे.हे तिघे बापलेक मुंबई एयरपोर्टवरुन बाहेर पडताना दिसत आहेत. पण यादरम्यान असं काही घडलं की अभिनेता प्रचंड अस्वस्थ झाला. पाहूया नेमकं काय घडलंय.

प्रसिद्ध सेलिब्रेटी फोटोग्राफर विरल भयानीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शाहरुख खानचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये शाहरुख आणि त्याची दोन्ही मुले एयरपोर्टवरुन बाहेर पडताना दिसून येत आहेत. दरम्यान एक व्यक्ती अचानक शाहरुखजवळ येतो, आणि त्याचा हात धरुन सेल्फी घेण्याचा प्रयत्न करतो. अशातच शाहरुख खान अस्वस्थ झालेला दिसतो. आणि तो त्या चाहत्यांचा हात झटकून अबरामसोबत दूर होतो. यावेळी त्याचा मोठा मुलगा आर्यन खान त्याच्याजवळ येऊन परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न करतो.

(हे वाचा: Taapsee Pannu: कॉफी विथ करण कार्यक्रमात न दिसण्याबद्दल बोलली तापसी; 'माझं सेक्स लाईफ...')

दरम्यान सोशल मीडियावर हा व्हिडीओ प्रचंड चर्चेत आला आहे. या व्हिडीओवर आता संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काहींना किंग खानच्या वागण्यात वाटत नाहीय. तर काहींना चाहत्यांच्या वागण्यात काही चुकीचं वाटत नाहीय. काहींनी कमेंट करत लिहलंय, 'असं अचानक येऊन कुणी हात धरण्याचा प्रयत्न करत असेल तर अशी रिऍक्शन साहजिक आहे. तर काहींनी लिहलंय, 'चाहत्यांमुळे सेलेब्रेटींना स्टारडम आहे त्यामुळे त्यांचं असं वागणं चुकीचं आहे'.

First published:
top videos

    Tags: Aryan khan, Bollywood News, Entertainment, Shahrukh khan and abram