मुंबई, 27 जुलै- बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका नेहा कक्कर नेहमीच आपल्या गोड आवाजाने आणि स्वभावाने चाहत्यांचं मन जिंकत असते. ही गायिका आज तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनली आहे. नेहा नेहमीच आपल्या लहान-लहान गोष्टींमधून चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. आजसुद्धा गायिकेने असंच काहीसं केलंय. नेहाने आज आपल्या हातावर आयुष्यातील पहिला टॅटू बनवला आहे. तिचा हा टॅटू सध्या चांगलाच चर्चेत आहे.
नेहा कक्करच्या आवाजावर फक्त देशातीलच नव्हे तर विदेशातील लोकसुद्धा फिदा आहेत. नेहाचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. नेहा सतत आपल्या गाण्याच्या आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. नेहा नेहमीच आपले सुंदर-सुंदर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. आजही या गायिकेने असाच एक व्हिडीओ शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
नेहा कक्करने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नुकतंच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये अभिनेत्रीने टॅटू बनवलेला इदूषण येत आहे. विशेष म्हणजे नेहाने आपल्या आयुष्यात हा पहिलाच टॅटू बनवला आहे. नेहाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिच्या हातावर टॅटू बनवण्यात येत असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये नेहाला टॅटू बनवताना किती वेदना झाल्या आणि टॅटू पूर्ण झाल्यांनतर कसा आनंद झाला? हे सर्वकाही या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. नेहाने आपल्या हातावर 'रोहन' असं काढून घेतलं आहे.
View this post on Instagram
(हे वाचा: Alia Bhatt Pregnancy : प्रेग्नेंट आलियानं नवरा रणबीरच्या गाण्यावर केला डान्स, करण जोहर म्हणाला... )
रोहन हे नेहाच्या पतीचं नाव आहे. नेहा कक्करने दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 24ऑक्टोबर 2020 मध्ये गायक रोहनप्रीत सिंहसोबत लग्न केलं होतं. या दोघांमध्ये प्रचंड प्रेम आहे. दोघेही सतत सोशल मीडियावर आपले रोमँटिक फोटो शेअर करत असतात. नेहाने सध्या शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रोहन नेहाला मिठी मारुन आपलं प्रेम व्यक्त करताना दिसून येत आहे. सोबतच पुष्पगुच्छ देऊन तिचं स्वागतसुद्धा करत आहे. या दोघांमधील हे प्रेम पाहून चाहते त्यांचं कौतुक करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment, Neha kakkar