मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Aamir Khan : आधी माफी, मग Video डिलीट; काय चाललय काय? आमिरवर भडकले नेटकरी

Aamir Khan : आधी माफी, मग Video डिलीट; काय चाललय काय? आमिरवर भडकले नेटकरी

लाल सिंह चड्ढा सिनेमाच्या वादावर माफी मागणारा व्हिडीओ शेअर करून नंतर डिलीट केल्यानं आमिर पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर.

लाल सिंह चड्ढा सिनेमाच्या वादावर माफी मागणारा व्हिडीओ शेअर करून नंतर डिलीट केल्यानं आमिर पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर.

लाल सिंह चड्ढा सिनेमाच्या वादावर माफी मागणारा व्हिडीओ शेअर करून नंतर डिलीट केल्यानं आमिर पुन्हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई,   01 सप्टेंबर : बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खान सध्या चर्चेचा विषय बनला आहे. आमिरचा लाल सिंह चड्ढा या सिनेमामुळे निर्माण झालेला वाद काही थांबवण्याचं नाव घेत नाही. सिनेमा बॉक्स ऑफिसवर जोरदार आपटल्यानंतर आमिरची बोलतीच बंद झाली आहे. अभिनेत्यानं सिनेमाचं झालेलं नुकसान भरुन देण्याची घोषणा केली आहे. सिनेमातील आपलं मानधन देखील नाकारलं आहे. अशातच आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसच्या ट्विटर अकाऊंवरुन एक व्हिडीओ शेअर करण्यात आला. ज्या व्हिडीओतून आमिरनं सर्वांची माफी मागितली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र सर्वांची माफी मागणारा हा व्हिडीओ आमिरनं काही वेळातच डिलिट केल्याचं म्हटलं गेलं आहे. नेटकऱ्यांच्या हे लक्षात येताच त्यानं पुन्हा हा व्हिडीओ पोस्ट केल्याचं म्हटलं जात आहे.

आमिरनं ट्विटरवर शेअर केलेल्या ऑडिओ व्हिडीओमध्ये म्हटलं गेलं होतं की, 'आपण सगळे माणूस आहोत आणि चुका या माणसांकडूनच होतात. कधी त्या नको ते बोलून होतात तर कधी नको ते काम करुन. कधी न कळत तर कधी रागात. कधी मस्करीत होतात तर कधी न बोलता. मी जर तुम्हाला कोणत्याही प्रकारे दुखावलं असेल तर मला माफ करा. मी तुम्हा सगळ्यांची माफी मागतो'. आमिरने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

हेही वाचा - अमिताभ-रेखांविषयी हे काय बोलून गेला टायगर श्रॉफ? करण जोहरही झाला थक्क

आमिरचा माफी मागणारा व्हिडीओ  पोस्ट केल्यानंतर  12 तासांनी डिलिट करण्यात आला. व्हिडीओ डिलिट होताच नेटकरी चांगलेच संतापले. यावरुन आमिरला खडे बोल सुनावण्यास सुरुवात झाली. अनेकांनी आमिरचं प्रोडक्शन ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचं म्हटलं. पण आमिर खान प्रोडक्शनच्या ट्विटर अकाऊंटला माफी मागणारा व्हिडीओ दिसत आहे. हा व्हिडीओ डिलीट केल्यानंतर आपण पुन्हा ट्रोल होत आहोत हे लक्षात आल्यानंतर व्हिडीओ पुन्हा शेअर करण्यात आला असं नेटकऱ्यांकडून म्हटलं जात आहे.

दरम्यान व्हिडीओ डिलिट झाल्यानं लक्षात आल्यानंतर नेटकऱ्यांनी आमिरला प्रचंड ट्रोल केलं. आधी माफी मागितली. मग व्हिडीओ डिलिट केला आणि आता पुन्हा व्हिडीओ पोस्ट केला. आमिर तुझं चाललंय काय? असा सवाल नेटकऱ्यांनी विचारला. इतकंच नाही तर आता माफी मागून काहीच फायदा नाही, असं म्हणत आमिरला ट्रोल करण्यात आलं.

First published:

Tags: Aamir khan, Bollywood, Bollywood actor, Bollywood News