मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Imran Khan: बॉलिवूडपासून दूर, पत्नीपासून विभक्त आमिरचा भाचा इम्रान खान पडलाय 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात?

Imran Khan: बॉलिवूडपासून दूर, पत्नीपासून विभक्त आमिरचा भाचा इम्रान खान पडलाय 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात?

इम्रान खान

इम्रान खान

आमिर खानचा भाचा इम्रान खानने 'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याचा पदार्पणातील सिनेमा हिट झाला. त्यानंतर त्याला चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जाऊ लागले. पण अचानक 2015 साली इम्रानने अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला. आता तो पुन्हा चर्चेत आला आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 06 फेब्रुवारी:  मनोरंजन सृष्टीत असे काही कलाकार आहेत ज्यांनी एकेकाळी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. विविध भूमिका केल्या पण ते अचानक चित्रपटसृष्टीतुन गायब झाले. पण आजही त्यांना चाहते आठवणीत ठेवतात. या कलाकारांमध्ये बऱ्याच वेळा अभिनेत्रींची नावे अग्रणी असतात. बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींनी लग्नानंतर चित्रपटसृष्टी सोडून दिली आणि इतर देशात स्थायिक झाल्या. पण या यादीत एका अभिनेत्याचं नाव वारंवार घेतलं जाते. ज्याने एकेकाळी बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींसोबत मुख्य भूमिकेत काम केलं, त्याचे सिनेमे आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. पण तो अचानक चित्रपटसृष्टीतून गायब झाला. हा अभिनेता म्हणजे आमिर खानचा भाचा इम्रान खान.

आमिर खानचा भाचा इम्रान खानने 'जाने तू या जाने ना' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या सिनेमात तो जिनिलिया देशमुख सोबत झळकला होता. या दोघांच्या भन्नाट केमिस्ट्रीने प्रेक्षकांना वेड लावलं होतं. त्याचा पदार्पणातील सिनेमा हिट झाला. त्यानंतर त्याला चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर इम्रान खानने दीपिका  पदुकोण,कतरिना कैफ, करीना कपूर, कंगना रानौत अशा आघाडीच्या अभिनेत्रींसोबत स्क्रीन शेअर केली. पण अचानक 2015 साली इम्रानने अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला.

हेही वाचा - Sidharth- Kiara Wedding: आलिशान झुंबरं अन् फुलांच्या रांगोळ्या; सिड कियाराच्या लग्नासाठी असा सजला सूर्यगढ पॅलेस

वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर इमरानने 2011 मध्ये अवंतिका मलिकसोबत लग्न केले. पण 2019 मध्ये हे कपल वेगळे झाले. दोघांना एक मुलगी इमारा आहे. आता हा अभिनेता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण नुकताच तो एका अभिनेत्रीच्या प्रेमात असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

इम्रान खान नुकताच विमानतळावर एका मुलीसोबत दिसला होता. ही मुलगी साऊथ अभिनेत्री लेखा वॉशिंग्टन आहे. दोघांची केमिस्ट्री पाहून लोकांना वाटतंय की इम्रानच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेमाने दार ठोठावले आहे. लेखा हा एक साउथ अभिनेत्री आणि निर्माती तसेच  डिझायनर आहे. इम्रान आणि लेखाच्या नात्याबद्दल दोघांनी अद्याप अधिकृत वक्तव्य आलेले नाही. पण इम्रानला खूश पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. लेखाबद्दल सांगायचे तर  'फ्रेम' या इंग्रजी चित्रपटापासून तिच्या करिअरची सुरुवात झाली. नंतर ती व्हिडिओ जॉकी म्हणून काम करू लागली. याशिवाय ती हिंदी चित्रपटांमध्येही दिसली आहे. यामध्ये 'युवा', 'मटरू की बिजली का मंडोला', 'पीटर गया काम से' आदींचा समावेश आहे.

गेल्या वर्षी इमरान आणि अवंतिका मलिक यांनी लग्नापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या. दोघांनी अनेक वेळा आपले मतभेद दूर करण्याचा निर्णय घेतला, पण काहीही झाले नाही. इम्रानला पुन्हा अवंतिकासोबत राहायचे नाही, असेही बोलले जात होते. ते वैवाहिक जीवनाला संधी देण्याच्या मनस्थितीत नाहीत. दुसरीकडे अवंतिका या लग्नाला दुसरी संधी देत ​​आहे.पण जेव्हा काही घडले नाही तेव्हा त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या लग्नापासून इम्रान आणि अवंतिका यांना 8 वर्षांची इमारा ही मुलगी आहे. इम्रान आणि अवंतिका यांचे २०११ मध्ये लग्न झाले होते. 2019 मध्ये ते विभक्त झाले.

First published:

Tags: Aamir khan, Bollywood, Bollywood actor, Bollywood News, Entertainment