जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Aai Kuthe Kay Karte:'एका सीनसाठी करावी लागते अशी कसरत', शूटिंगदरम्यानचा VIDEO होतोय VIRAL

Aai Kuthe Kay Karte:'एका सीनसाठी करावी लागते अशी कसरत', शूटिंगदरम्यानचा VIDEO होतोय VIRAL

Aai Kuthe Kay Karte:'एका सीनसाठी करावी लागते अशी कसरत', शूटिंगदरम्यानचा VIDEO होतोय VIRAL

चित्रपट आणि मालिकांचं शूटिंग वाटतं तितकं सोपं नसतं एव्हाना सर्वानांच याचा अंदाज आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग घेताना किती अडचणी येतात, किती मेहनत करावी लागते हे पाहायला मिळतं. नुकतंच ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karate) फेम अनिरुद्ध अर्थातच अभिनेते मिलिंद गवळी यांनी आपल्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई,14  जुलै-   चित्रपट आणि मालिकांचं शूटिंग वाटतं तितकं सोपं नसतं एव्हाना सर्वानांच याचा अंदाज आला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच चित्रपट आणि मालिकांचे शूटिंग घेताना किती अडचणी येतात, किती मेहनत करावी लागते हे पाहायला मिळतं. नुकतंच ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) फेम अनिरुद्ध अर्थातच अभिनेते मिलिंद गवळी यांनी आपल्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांचे छायाचित्रकार राजू देसाई सीनमध्ये जिवंतपणा आणण्यासाठी कसे झटत आहेत हे दिसून येत आहे. स्टार प्रवाहावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका तुफान लोकप्रिय मालिका बनली आहे. ही मालिका सतत टीआरपी रेसमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकांवर असते. यावरुन मालिकेची लोकप्रियता लक्षात येते. तसेच मालिकेत सतत नवनवीन रंजक ट्विस्ट अँड टर्न्स येत असतात. त्यामुळेच प्रेक्षकांना मालिकेच्या प्रत्येक भागाची प्रचंड उत्सुकता लागलेली असते. दरम्यान मालिकेच्या प्रत्येक भागात तितकीच वास्तविकता आणि खरेपणा आण्यासाठी कलाकारांसोबतच तांत्रिक विभाग आणि एकंदरीतच पडद्यामागे हजारो हात राबत असतात. याचं एक उदाहरण मिलिंद गवळीनीं शेअर केलं आहे. या मालिकेतील अनिरुद्ध म्हणजेच अभिनेता मिलिंद गवळी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ त्यांचे छायाचित्रकार राजू देसाई यांचा आहे. सीन अधिकाधिक खुलावा आणि वास्तववादी दिसावा याकरता कलाकारांसोबत दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ मंडळीही किती झटत असतात.याचं त्यांनी उत्तम उदाहरण दिलं आहे. राजू देसाई यांनी एक सीन चक्क टेम्पोवर चढून शूट केला. राजू यांच्या या अनोख्या प्रयत्नाचं मिलिंद गवळी यांनी भरभरून कौतुक केलं आहे.

जाहिरात

**(हे वाचा:** पत्नी प्रिया बापटच्या पावलावर पाऊल टाकतोय उमेश कामत; अभिनेत्याची नवी पोस्ट एकदा पाहाच ) मालिकेत सध्या फारच रंजक ट्रॅक सुरु आहे. मालिकेत यशचा मित्र नील ईशासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करतो. यश हा प्रयत्न उधळून लावतो आणि यादरम्यान त्यांच्यामध्ये झटपट होते. आणि नीलचा मृत्यू होतो. त्यांनतर पोलीस यशला ताब्यात घेतात. मालिकेच्या येत्या भागात नेमकं काय घडणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात