मराठीतील लोकप्रिय जोडप्यांपैकी एक म्हणून प्रिया बापट-उमेश कामत यांना ओळखलं जातं. हे दोघेही सतत एकमेकांची चेष्टामस्करी करत असतात. दोघांमध्ये फारच छान बॉन्डिंग आहे. उमेश आणि प्रिया सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. नुकतंच अभिनेत्याने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये उमेश फोटोसाठी पोज देताना दिसून येत आहे. इतकंच नव्हे तर उमेशने फोटो शेअर करत कॅप्शन दिलंय, ''फॉलोईंग बायकोचे फोटो स्टेप्स' यावर कमेंट करत प्रियाने म्हटलंय, 'फोटो मीच काढलाय कामत' तर उमेशनेही उत्तर देत म्हटलंय, 'तुझे फोटो कोण काढतं बापट?' या दोघांची टॉम & जेरीसारखी हटके केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड पसंत पडत आहे.