Home /News /entertainment /

Aai Kuthe Kay Karte: देशमुख कुटुंबावर नवं संकट; यशवर लागणार खुनाचा आरोप?

Aai Kuthe Kay Karte: देशमुख कुटुंबावर नवं संकट; यशवर लागणार खुनाचा आरोप?

आई कुठे काय करते मालिकेत नील या नव्या पात्राची एंट्री दाखवण्यात आली मात्र याच नीलमुळे देशमुख कुटुंबातील यशवर नवीन संकट कोसळणार आहे.

  मुंबई, 30 जून:  स्टार प्रवाह ( Star Pravah) वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेनं नव वळणं घेतलं आहे. पिकनीकला गेलेल्या इशावर नील जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करतो.  नीलमुळे मालिकेला उत्कंठावर्धक वळण आलं आहे. इशाला वाचवण्यासाठी यश नीलबरोबर मारामारी करतो. स्वत: आणि इशाचा जिव वाचवण्यासाठी यश नीलच्या डोक्यात काठीनं हल्ला करतो. नील रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळतो.  याच नोटवर मालिकेनं नव वळण घेतलं असून यशमुळे नीलचा जीव जाणार आहे. यशवर खुनाचा आरोप होणार आहे. मालिकेचा एक प्रोमो प्रदर्शित झाला असून त्यात प्रेक्षकांना आता पूर्ण एपिसोड पाहण्याची उत्सुकता आहे. मालिकेत नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागामध्ये दाखवण्यात आलंय कि,  यश आणि इशा त्यांच्या मित्रमैत्रिणींसह फिरण्यासाठी जातात. तिथेच त्यांची नीलसोबत ओळख होते. नील या  पात्राची एंट्रीपासून इशासह जवळीक दाखवण्यात आली आहे.  सुरुवातीच्या भागामध्ये तो तिचा हात पकडतो आणि त्यांची नजरानजर होते. ही घडामोड यश देखील पाहतो आणि तो इशाला नीलपासून सावध करण्याचा प्रयत्न करतो. आता नीलमुळे देशमुख कुटुंबातील यशवर नवीन संकट कोसळणार आहे.
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  हेही वाचा - अभिनेता प्रसाद ओकनं दिल्या महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा! शेअर केला खास PHOTO नुकत्याच प्रदर्शित झालेल्या प्रोमोमध्ये यश कडून नीलचा खून होतो असं दाखवले आहे. यशवरती  नीलच्या खुनाचा आरोप लागला आहे आणि त्याला अटक होऊन जेल होईल असं मालिकेचे पुढचे कथानक असणार आहे. आता यश नीलचा खून का करतो की तो एक अपघात आहे हे बघणं महत्वाचं आहे. तसंच या घटनेनंतर  या सगळ्या परिस्थितीतून देशमुख कुटुंब कसा मार्ग काढतं  आणि खुनाचा आरोप असलेल्या यशाची जेलमधून  सुटका  होते का  हे बघणं महत्वाचं ठरणार  आहे. ही मालिका सध्या  प्रेक्षकांच्या पसंतीची  मालिका आहे. ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर देखील चाहते मोठ्या प्रमाणात ही मालिका पाहतात. त्यामुळेच हि महाराष्ट्रातील टॉप मालिकांमध्ये या मालिकेची गणना केली जाते. या मालिकेत प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी सतत नवनवीन पात्रांची एंट्री करुन कथानक आणखी रंजक बनवले जाते.  मालिकेत मागीत काही भागांमध्ये  अरुंधती (Arundhati aka Madhurani Prabhulkar) दिसत नाही आहे. मधुराणीने वैयक्तिक कारणामुळे ब्रेक घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मालिकेचा सगळा प्रकाशझोत अनिरुद्ध आणि संजनावर आहे. त्या दोघांमधले सीनही अधिक दाखवले जात आहेत. परंतू सगळी काम आटोपून ती पुन्हा शुटींगला परतली आहे.
  Published by:Minal Gurav
  First published:

  Tags: Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या