मुंबई, 21 मार्च- आई कुठे काय करते ( Aai Kuthe Kay Karte) मालिका सततच्या ट्वीस्टमुळे नेहमी चर्चेत असते. अरुंधतीचा घटस्फोट असेल किंवा संजना आणि अनिरुद्धच लग्न असेल मालिका सतत चर्चेत असते. चारित्र्यावर संय़श घेतल्याने अरुंधतीनं देशमुखाचं घर सोडलं. आता ती नवीन घरात शिफ्ट झाली आहे. अरुंधतीनं या घरातून नव्याने सुरूवात केली आहे. मात्र असं जरी असलं तरी अनिरुद्ध काय तिच्या आय़ुष्यात लुडबूड करायचं थांबवेना. तो अरुंधतीवर लक्ष ठेवण्यासाठी चोरपावलांनी अरुंधतीच्या घरात प्रवेश करतो. हे जेव्हा अरुंधतीला कळते तेव्हा ती अनिरुद्धला घरातून धक्के देऊन ( Aai Kuthe Kay Karte latest episode) बाहेर काढते.
एका पोर्टलनं दिलेल्या माहितीनुसार, अरुंधती अनिरुद्धला घरात रात्रीच्यावेळी चोर पावलांनी आल्यामुलळे धक्के देऊन बाहेर काढणार आहे. शिवाय यापुढे असं केलं तर पोलिसात देण्याची देखील धमकी देणार आहे.
वाचा- तापसी पन्नू स्टारर ‘Shabaash Mithu’ चित्रपटाचा टीझर रिलीज, VIDEO प्रोमोमध्ये अनिरुद्धचा सगळा प्रकार अरुंधती यशला घाबरून सांगताना दिसत आहे. यावर तो तिच्या घराचे लॉक बदलण्याचा निर्णय घेतो. शिवाय आप्पा देखील यशला विचारतात की, तू अरुंधतीच्या घरी जोपायला गेला होतास ती कशी आहे याबद्दल विचरतात. तेव्हा तो काही लोक अरुंधतीच्या घरावर नजर ठेवत असल्याचे सांगतो. यावेळी ही बोलणं संजन ऐकते आणि ती अनिरुद्धला म्हणते की, नेमका तू रात्री गार्डनमध्येच गेला होतास ना..आता अनिरुद्धचं अशा वागण्याचं सत्य संजनासमोर आल्यानंतर ती कशी रिअॅक्ट होणार याचा उलगडा देखील लवकरच होईल. शिवाय अनिरुद्धच्या अशा वागण्यामागे नेमके काय कारण आहे याचा देखील उलगडा लवकरच होईल. पण या नवीन ट्वीस्टची प्रेक्षक मात्र वाट पाहत आहेत.
अनिरुद्धने अरुंधतीला घटस्फोट दिला आहे. असं जरी असलं तरी तो नेहमीच अरुंधतीच्या प्रत्येक गोष्टीत लक्ष घालताना दिसतो व तिला प्रत्येकवेली त्रास देण्याचा प्रयत्न करताना दिसतो. संजना देखील नेहमीच अरुंधतीवर जळताना दिसते. तिच्याविषयी घरातल्यांच्या मनात संजना चुकीच्या गोष्टी भरवताना दिसते. अरुंधती आणि आशुतोषच्या मैत्रिचा नेहमी चुकीचा अर्थ काढताना दिसते. मात्र अरुंधती नेहमी याकडं दुर्लक्ष करताना दिसते.