जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Shabaash Mithu Teaser Out: तापसी पन्नूच्या स्टारर 'Shabaash Mithu' चित्रपटाचा टीझर रिलीज, VIDEO

Shabaash Mithu Teaser Out: तापसी पन्नूच्या स्टारर 'Shabaash Mithu' चित्रपटाचा टीझर रिलीज, VIDEO

Shabaash Mithu

Shabaash Mithu

अभिनेत्री तापसी पन्नूचा (Taapsee Pannu) बहुप्रतिक्षीत चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तापसीच ‘शाबाश मिठू’ (Shabaash Mithu Teaser) या चित्रपटाचा टीझर नुकताचं रिलीज झाला आहे. ‘शाबाश मिठू’ या चित्रपटाची कथा भारतातील महिला क्रिकेटवर आधारित आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 21 मार्च: अभिनेत्री तापसी पन्नूचा (Taapsee Pannu) बहुप्रतिक्षीत चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तापसीच ‘शाबाश मिठू’ (Shabaash Mithu Teaser) या चित्रपटाचा टीझर नुकताचं रिलीज झाला आहे. ‘शाबाश मिठू’ या चित्रपटाची कथा भारतातील महिला क्रिकेटवर आधारित आहे. ‘शाबाश मिट्ठू’ हा भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या जीवनावर येणारा बायोपिक आहे. यावर्षी हा चित्रपट प्रदर्शित होईल. बॉलिवूडमधली आघाडीची अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) मिताली राजची भूमिका साकारताना दिसणार आहे. भारतीय प्रेक्षकांना बॉलिवूड आणि क्रिकेट आवडतं. या चित्रपटद्वारे क्रिकेटपटूंवरील बायोपिकला अजून बळ मिळेल. एमएस धोनीच्या बायोपिकनंतर क्रिकेटपटूंवरील चित्रपटांचा ट्रेंड सुरु झाला. सर्वातआधी सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर डॉक्युमेंट्री कम बायोपिक आला.

तापसी पन्नूसह या चित्रपटात तर अभिनेता विजय राज, अजित अंधारे आणि अभिनेत्री प्रिया एव्हॉन देखील या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, यावर्षी तापसी पन्नू अनेक चित्रपटांमध्ये दिसणार आहे. ती शेवट स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट ‘रश्मी रॉकेट’मध्ये दिसली होती. आकर्ष खुराना दिग्दर्शित या चित्रपटात गुजरातमधील कच्छमध्ये राहणाऱ्या एका मुलीची कथा दाखवण्यात आली आहे. या चित्रपटात तापसी पन्नूने मुख्य भूमिका साकारली आहे. तापसीशिवाय या चित्रपटात अभिषेक बॅनर्जी, प्रियांशू आणि सुप्रिया पाठक यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. रश्मी रॉकेट हा चित्रपट झी5 वर प्रदर्शित झाला होता. तापसी पन्नूने 2010 मध्ये राघवेंद्र राव दिग्दर्शित ‘झुमंडी नादम’ या तेलगू चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. तापसीचे दुसरे तमिळ पदार्पण होते ‘अदुकलम’. या चित्रपटात तिच्यासोबत धनुष दिसला होता. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला होता. या चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 6 राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात