जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ओमिक्रॉनचा धसका! 'आई कुठे काय करते' मालिकेच्या सेटवरील हा PHOTO सांगतोय सत्य

ओमिक्रॉनचा धसका! 'आई कुठे काय करते' मालिकेच्या सेटवरील हा PHOTO सांगतोय सत्य

ओमिक्रॉनचा धसका! 'आई कुठे काय करते' मालिकेच्या सेटवरील हा PHOTO सांगतोय सत्य

कोरोना परस्थिती लक्षात घेता मराठी मालिकांच्या सेटवर देखील कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवर देखील याची योग्य ती काळजी घेतली जात आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 8 जानेवारी- सगळीकडे सध्या कोरोनाचा कहर पाहिला मिळत आहे. मुंबईमध्ये तर कोरोनाचा विस्फोट झाला आहे. दिवसेंदिवस आकडेवारी वाढत आहे. कलाविश्वाला देखील कोरोनाचा विळखा बसला आहे. विशेष करून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत बॉलिवूडसह मराठी कलाविश्वातील कलाकारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. आता ही सगळी परस्थिती लक्षात घेता मराठी मालिकांच्या सेटवर देखील कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte ) या मालिकेच्या सेटवर देखील याची योग्य ती काळजी घेतली जात आहे. सेटवरील काही फोटो समोर आले आहेत. एका पोर्टलनं याबद्दल माहिती दिली आहे. कोरोना व ओमिक्रॉनचा धोका लक्षात घेता स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेतील कलाकार कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहेत. मालिकेत काही ज्येष्ठ मंडळी देखील आहे. त्यांच्या तब्यतेची काळजी म्हणून तसेच मालिकेची चित्रीकरण परत बंद पडू नये म्हणून कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात आहे. या फोटोत आप्पा, यश व अरुंधतीच्या तोंडाला मास्क दिसत आहेत. सुरक्षेच्या साधनांचा सर्व वापर करून सेटवर योग्य ती काळजी घेतल्याचे दिसत आहे.कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा मनोरंजन विश्वाला मोठ फटका बसला होता. याचा परत फटका बसून नये वमालिकेचेचित्रीकरण थांबू नये म्हणून ही काळजी घेतली जात आहे.

जाहिरात

मराठी मालिका ‘आई कुठे काय करते’ अल्पावधीतच प्रचंड लोकप्रिय झाली आहे. ही मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेत सध्या लग्न समारंभ सुरु आहे. बऱ्याच दिवसांपासून ज्या लग्नाची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती त्या अभिषेक आणि अनघाचा विवाहसोहळा लवकरच पार पडणार आहे. मालिकेत सध्या अभि आणि अनघाच्या लग्नाची धामधूम आहे. याशिवाय मालिका सध्या वेगळ्या वळणावर आहे. या लग्नात अरुंधतीने आपल्या मित्राची बाजू घेत अनिरुद्धला खडसावले आहे. त्यामुळे अरुंधतीमधील हा बदल प्रेक्षकांना देखील आवडत आहे. वाचा- KGF सुपरस्टार यशचे वडील होते बस ड्रॉयव्हर?पाहा अभिनेत्याचा खडतर जीवनप्रवास महाराष्ट्रात कोरोना बाधितांच्या संख्येत (Coronavirus cases in Maharashtra) झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता कठोर पावलं उचलली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात