जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / KGF सुपरस्टार यशचे वडील होते बस ड्रॉयव्हर?अभिनेत्याचा खडतर जीवनप्रवास पाहून व्हाल थक्क

KGF सुपरस्टार यशचे वडील होते बस ड्रॉयव्हर?अभिनेत्याचा खडतर जीवनप्रवास पाहून व्हाल थक्क

KGF सुपरस्टार यशचे वडील होते बस ड्रॉयव्हर?अभिनेत्याचा खडतर जीवनप्रवास पाहून व्हाल थक्क

KGF फेम यशचा आज (8 जानेवारी) वाढदिवस (Yash Birthday) आहे. त्यामुळे आज जगभरातले त्याचे चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

     मुंबई, 8 जानेवारी-    दाक्षिणात्य चित्रपटांतल्या अभिनेत्यांचं स्टारडम ही वेगळीच गोष्ट आहे. कारण तिकडच्या अभिनेत्यांचे फॅन्स जबरदस्त असतात. दाक्षिणात्य चाहत्यांचं अभिनेत्यांवर एवढं प्रेम असतं, की अगदी दुधाचा अभिषेकही पोस्टर्सना घालण्यात येतो. दाक्षिणात्य अभिनेत्यांचा जीवनप्रवासही अवाक करणारा असतो. मग ते रजनीकांत असोत वा पुनीत राजकुमार. असाच एक दाक्षिणात्य अभिनेता म्हणजे यश उर्फ नवीन कुमार गौडा होय. आज त्याच्याबद्दल कधीही न ऐकलेल्या काही गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. दाक्षिणात्य अभिनेत्यांमध्ये चर्चेत असलेलं नाव म्हणजे यश   (Yash)   होय. त्याचं खरं नाव नवीन कुमार गौडा आहे. यशच्या KGF चॅप्टर 1 (KGF Chapter 1)   या सिनेमाने त्याला फक्त कन्नड चित्रपटातच नाही, तर बॉलिवूडमध्येही ओळख मिळवून दिली. आज यशचं नाव जगभरातल्या उत्तम अभिनय करणाऱ्या अभिनेत्यांमध्ये घेतलं जातं. यशचा हा नंबर 1 चा प्रवास सहज सोपा नव्हता.

    जाहिरात

    KGF फेम यशचा आज (8 जानेवारी) वाढदिवस (Yash Birthday) आहे. त्यामुळे आज जगभरातले त्याचे चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. यश हे त्याचं स्टेज नेम असून, त्याचे चाहते त्याला रॉकिंग स्टार असंही म्हणतात. त्याने विशेषतः कन्नड चित्रपटांतच काम केलं आहे. यशचा समावेश कन्नड चित्रपटसृष्टीतल्या सर्वांत जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांमध्ये होतो; पण तुम्हाला माहीत आहे का, की यश हा एका सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा असून, त्याचे वडील BMTC परिवहन सेवेत चालक म्हणून काम करतात. आज यशने मिळवलेली करोडोंची संपत्ती आणि नावानंतरही ते चालक म्हणूनच काम करणं पसंत करतात.

    यशची आई पुष्पा गृहिणी असून, यशला एक बहीणही आहे. तिचं नाव नंदिनी आहे. यशचं बालपण म्हैसूरमध्ये गेलं. पहिल्या चित्रपटातली सह-अभिनेत्री राधिका पंडित हिच्याशी त्याने लग्न केलं. यश आणि राधिकाला दोन मुलं आहेत. यश आणि राधिकाची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटात शोभेल अशी आहे. राधिका आणि यशने बरेच दिवस एकमेकांना डेट केलं. अनेक चित्रपटांत एकत्र कामही केलं आणि मग 2016 साली गुपचूप साखरपुडा करून त्याच वर्षी एका खासगी समारंभात लग्न केलं. सामान्य कुटुंबातल्या यशने शिक्षण झाल्यावर अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. चित्रपटात येण्याआधी त्याने मालिकांमध्येही काम केलं. रॉकिंग स्टार यशने 2008 साली कन्नड चित्रपटातून डेब्यू केलं. त्याच्या पहिल्या चित्रपटाचं नाव Moggina Manasu असं होतं. यशच्या चित्रपटांच्या यादीमध्ये राजधानी, ड्रामा, गुगली, राजा हुली, मिस्टर अँड मिसेस रामाचारी, मास्टरपी आणि केजीएफ : चॅप्टर 1 यांचा समावेश होतो. आता यशच्या चाहत्यांना केजीएफ : चॅप्टर 2 (KGF Chapter: 2) सिनेमाची उत्सुकता आहे. तो या वर्षी रिलीज होणार आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात