Home /News /entertainment /

VIDEO : अरुंधती होळीचा सण साजरा करणार आशुतोषसोबत, रंगणार सुरांची मैफिल

VIDEO : अरुंधती होळीचा सण साजरा करणार आशुतोषसोबत, रंगणार सुरांची मैफिल

होळीचा सण आहे आणि पहिल्यांदाच अरुंधती तिच्या देशमुख कुटुंबाशिवाय होळी साजरी करताना दिसणार आहे. मात्र यादिवशी अरुंधती आणि आशुतोषच्या सुरांची (Aai kuthe kay karte latest episode) मैफिल रंगणार आहे.

  मुंबई, 17 मार्च- आई कुठे काय करते (Aai kuthe kay karte) ही मालिका सध्या वेगळ्या वळणावर आहे. मालिकेत सतत नवीन ट्वीस्ट पाहायला मिळतात. अरुंधती नुकतीच नवीन घरात शिफ्ट झाली आहे. लवकरच तिच्या गाण्याच्या अल्बमचं देखील लॉन्च होणार आहे. या अल्बमधून अरुंधतीचं स्वप्न साकार होणार आहे. आता होळीचा सण आहे आणि पहिल्यांदाच अरुंधती तिच्या देशमुख कुटुंबाशिवाय होळी साजरी करताना दिसणार आहे. मात्र यादिवशी अरुंधती आणि आशुतोषच्या सुरांची (Aai kuthe kay karte latest episode)  मैफिल रंगणार आहे. याचा व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. चाहत्यांना देखील या दोघांना एकत्र पाहून आनंद झालं आहे. एका पोर्टलनं दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या होळीला आशुतोष आणि अरुंधती (Ashutosh and Arundhati) यांच्यात सुरांची होळी रंगणार आहे. आशुतोषच्या गिटाराच्या तालावर अरुंधती तिच्या गोड आवाजात सुखाचे चांदणे गाणार आहे. प्रेक्षकांना खऱं तर ही पर्वणी असणार आहे. या भागासाठी चाहते देखील उत्सुक आहेत. शिवाय अरुंधतीसाठी पहिली होळी असणार आहे जी ती देशमुख कुटुंबासोबत साजरी करू शकणार नाही.मात्र अरुंधती आता पुढे जाताना दिसत आहे. तिच्या गाण्याला, कामाला महत्त्व देताना दिसत आहे. खऱं तर ही नवीन अरुंधती प्रत्येकाला आवडत आहे. ती तिच्यासाठी जगताना दिसत आहे. तिच्यासोबत तिचा मित्र आशुतोष देखील तिला प्रोत्साहन देताना दिसतो. या दोघांच्या मैत्रिचे देखील प्रेक्षकांकडून कौतुक होत असते.
  View this post on Instagram

  A post shared by (@marathiserials_official)

  अरुंधती तिच्या नवीन मित्रमंडळीसोबत होळी साजरी करताना दिसत आहे. तर देशमुख कुटुंब देखील एकत्र येत होळी साजरी करत पुरणपोळीवर ताव मारताना दिसत आहे. अनघाने देशमुख कुटुंबाच अरुंधतीची जागा घेतल्याचे दिसते. ती नेहमी देशमुख कुटुंबाला बांधून ठेवण्याचा प्रयत्न करते. प्रेक्षक अनघामध्ये अरुंधतीला पाहताना दिसतात. अनघाच्या अभिनयाचे देखील प्रेक्षकांकडून कौतुक होताना दिसते.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Aai Kuthe Kay Karte, Entertainment, Marathi entertainment, Tv serial

  पुढील बातम्या