मुंबई, 28 फेब्रुवारी- स्टार प्रवाह वाहिनीवरील आई कुठे काय करते मालिका छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेपैकी एक आहे. मालिकेचं कथानक अरूंधतीभेवती फिरताना दिसेत. त्यामुळेच या मालिकेतील अरुंधती, आशुतोष आणि संजना या मुख्य पात्रांसह अन्य भूमिकाही लोकप्रिय असल्याचं दिसून येते. त्यातलीच एक भूमिका म्हणजे ईशाची. अभिनेत्री अपूर्वा गोरे हिने अरुंधतीच्या लेकीची म्हणजेच ईशाची भूमिका साकारली आहे. या दोघींचा एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून सर्वांना प्रश्न पडला आहे की, ही अरुंधती सारखी दिसणारी दुसरी अभिनेत्री कोण आहे. कारण ईशा या नवीन लूकमध्ये अरूंधतीची हुबेहूब सावली दिसत आहे. अपूर्वा गोरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. अनेकदा ती मालिकेच्या सेटवरीव व्हिडिओ तर कधी फोटो शेअर करत असते. यावेळी देखील तिनं असाचा एक मालिकेच्या सेटवरील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने हुबेहूब अरुंधतीप्रमाणे गेटअप केला आहे. त्यामुळे ईशा अरुंधतीची छबी असल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांमधून उमटत आहे. वाचा- वर्षा उसगावकरांनी केलेलं टॉपलेस फोटोशूट; ‘त्या’ मॅगझीन शूटमुळे सापडलेल्या वादात ईशाचा नवीन लूकचं चाहत्यांनी देखील कौतुक केलं आहे. मायलेकीची जोडी या लूकमध्ये शोभून दिसत आहे. या दोघींच पडद्यावर देखील खास बॉन्डिंग पाहायला मिळत. जितकं ऑनस्क्रीन या माय लेकीचं बॉन्डिंग खास आहे तितकचं ऑफस्क्रीन देखील यांच्यातील बॉन्डिंग खास आहे. मुलगी नेहमी आईची सावलीच असते. तसचं काही ईशाच्या बाबतीत आहे. ती देखील अरुंधतीप्रमाणेच हळूहळूप्रमाणे समजूतदार व संयमाने वागताना व निर्णय घेताना दिसते.
सध्या मालिकेच अरूंधतीच्या लग्नाची घाई पाहायला मिळत आहे. प्रेक्षक देखील अरुंधतीच्या निर्णयाचे कौतुक करत आहे. तिच्या लग्नाच्या निर्णयाला प्रेक्षकांनी पाठिंबा दर्शवला आहे. काहींनी तिला ट्रोल देखील केलं होतं.अरुंधती आणि आशुतोष यांच्या लग्नामुळं देशमुखांच्या घरातील प्रत्येक सदस्य लग्नाच्या धावपळीत व्यस्त आहे. यामध्येच ईशाने अरुंधतीप्रमाणे म्हणजेच तिच्या आईसारखा गेटअप करुन आईला सरप्राईज दिलं आहे. ईशाचा हा लूक पाहून अरुंधतीही आश्चर्यचकित झाली असून या दोघींनी छानसा व्हिडिओ देखील शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये ईशाने अरुंधतीप्रमाणे साधी कॉटनची साडी नेसली आहे. तर केसांची छान वेणी घातली आहे. त्यामुळे तिच्यात अरुंधतीची झलक दिसून येत आहे. आपल्या लेकीला असं आपल्याच रुपात पाहून अरुंधतीने तिच्यासोबत एक व्हिडिओदेखील शूट केला आहे. सध्या या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.
marathi actress mrinal-kulkarni-writes-a-special-post-for-son-virajas-kulkarni on his birthday-sp आई कुठे काय करते मालिका सततच्या ट्वीस्टमुळे चर्चेत असते. टीआरपीच्या रेसमध्ये म्हणून मालिका नंबर वन टिकवून आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसते.