जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Mother's Day: आई कुठे काय करते मालिकेने आणला नवा फंडा; Insta Reel बनवायची दिला नवा मंत्रा

Mother's Day: आई कुठे काय करते मालिकेने आणला नवा फंडा; Insta Reel बनवायची दिला नवा मंत्रा

Mother's Day:  आई कुठे काय करते मालिकेने आणला नवा फंडा; Insta Reel बनवायची दिला नवा मंत्रा

स्टार प्रवाह यंदाच्या मदर्स डेला आपल्यासाठी एक संधी घेऊन आलं आहे. होय या माध्यमातून तुम्हाला तुमच्या आईवरील प्रेम व्यक्त करता येणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 7 मे- आईची भूमिका साकारणे कधी सोपे नसते. प्रत्येकाच्या आयुष्यात आईची भूमिका महत्त्वाची असते. मदर्स डे (Mothers Day 2022) प्रत्येक आईला समर्पित असतो. दरवर्षी मोठ्या उत्साहात आणि आनंदात मदर्स डे साजरा केला जातो. 8 मे हा जागतिक स्तरावर मदर्स डे म्हणजेच मातृदिन म्हणून साजरा केला जातो. मराठी मनोरंजन विश्वात देखील अशा काही मालिका आहेत, ज्या आई या विश्वाभोवती फिरताना दिसतात. त्यापैकी एक म्हणजे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते  (aai kuthe kay karte ) मालिका होय. या मालिकेत अरुंधती आईच्या भूमिका साकारताना दिसते. संबंध आई वर्गाचं अरुंधती या मालिकेत नेतृत्व करताना दिसते. म्हणून तर अरुंधती सर्वांची लाडकी बनली आहे. म्हणून स्टार प्रवाह यंदाच्या मदर्स डेला आपल्यासाठी एक संधी घेऊन आलं आहे. होय या माध्यमातून तुम्हाला तुमच्या आईवरील प्रेम व्यक्त करता येणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीनं नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये यश आणि अरुंधती म्हणजे आई आणि मुलातलं खास बॉन्डिंग..प्रेम…माया दाखवण्यात आलं आहे. हा व्हिडिओ खास आहे कारण यंदा Mother’s Day साठी खास #instareels बनविण्यासाठी ‘आई कुठे काय करते’ मालिकेनं गायिका आर्या आंबेकर हिच्या सुरेल आवजातील एक सुंदर शीर्षक गीत शेअर केलं आहे. या गाण्याचा वापर करून आपल्याला देखील आपल्या आईसोबत रील्स  (  Insta Reel)  बनवता येणार आहे. वाचा- शशांक केतरकरनं ‘तो’ VIDEO शेअर करत दिग्दर्शकचा खरा चेहरा आणला समोर बऱ्या जाणांना वाटतं की , आई कुठे काय करते मात्र अरूंधतीनं दाखवून दिलं आहे की, आई काय काय करू शकते. मुळात आईचं प्रेम असेल किंवा तिचं काम असेल मोजायला कुठली मोजपट्टी आजपर्यंत निर्माणचं झाली नाही. जगातील सर्वांत सुंदर नात कुठलं असेल तर ते आई आणि मुलाचं आहे. म्हणून निसर्गानं सर्वात दिलेली मोठी देणगी काय असेल तर ते मातृत्व आहे.

जाहिरात

2022 या वर्षी मदर्स डे मदर्स डे म्हणजेच जागतिक मातृदिन दर वर्षी मे महिन्यातील दुसर्‍या रविवारी साजरा केला जातो. संपूर्ण जगात मोठ्या उत्साहात हा दिन साजरा केला जातो. यंदा मे महिन्यातील दुसरा रविवार 8 तारखेला आहे. या वर्षी 8 मे 2022 रोजी मातृदिन साजरा केला जाईल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात