मुंबई, 7 मे- ‘होणार सून मी ह्या घरची’ आणि ‘पाहिले न मी तुला’ यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता शशांक केतकर ( shashank ketkar ) ‘मुरांबा’ या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहे. शशांक सोशल मीडियावर ( shashank ketkar latest Video) प्रचंड सक्रीय असतो. तो त्याचे विविध व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो. नुकताच शशांकनं एक मालिकेच्या सेटवरील व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्या या व्हिडिओला त्यानं एक भन्नाट कॅप्शन देखील दिल आहे ज्यामुळं तो चर्चेत आला आहे. शशांक केतकरनं एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो म्हणताना दिसत आहे की, अभिनेता असण्याचे फायदे..शुटींग लोकेशनवर देखील तुम्हाला काय खायला मिळत बघा..अस म्हणतो तो खाण्याच्या टेबलाकडं वळतो आणि एका एका मेन्यूचं नाव घेते. नंतर तो सगळ्या डब्याचे झाकणं काढून दाखवताना दिसत आहे. मात्र डब्बे मोकळेच दिसत आहे ..कशातच काहीच दिसत नाही..लगेच त्याचा व्हिडिओ सुरू असतानाचा दिग्दर्शकाचा मागून आवाज येत आहे ..अरे कशाला आमचं पितळ उघडं पाडत आहेस. वाचा- या’ अभिनेत्रीसोबतचा फोटो शेअर करत मृण्मयी म्हणाली, ‘ती जास्त चांगली दिसते’ शशांकनं देखील मजेदार व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, Director चा आवाज ऐकू येईल तुम्हाला -आमचं पितळ उघडं पाडतो आहेस रे 😂😂😂 त्याच्या या भन्नाट व्हिडिओवर चाहते देखील भन्नाट कमेंट करत आहेत..एकानं म्हटलं आहे की, आपण फक्त सेटवर नाचो…तर दुसऱ्यानं म्हटलं आहे की,राहू दे रे दादा संपला असेल… तर एकानं म्हटलं आहे की, आम्हाला माहिती आहे की तू घरचा डब्बा आणतोस..अशा काही कमेंट देखील चाहत्यांनी केल्या आहेत.
शशांक केतकरला जेवण बनवायला खूप आवडतं. शूटिंगच्या सेटवर घरातून डबा आणतो तो डबाही त्याने स्वत: बनवलेला असतो. शशांकनं मध्ये एकदा एका चॅलेंज ट्रेंडमध्ये सांगितलं होतं की, जेवण बनवण्याचा त्याला कधीच कंटाळा येत नाही. शूटिंग नसतं किंवा एक मालिका संपून दुसरे काम हातात नाही तेव्हा त्याला रिकामा वेळ असतो. तेव्हाही तो वेगवेगळे पदार्थ बनवण्याचाच उदय़ोग करत असतो. या पाककलेतून शशांकने आईच्या गावात हे हॉटेल सुरू केले. शिवाय त्यानं त्याचं यूटय़ूब चॅनेल सुरू केलं आहे. त्यात तो वेगवेगळे पदार्थ बनवताना दिसतो.