मुंबई, 3 मार्च- ‘आई कुठे काय करते’ मालिकेत आता अरुंधती आणि आशुतोषची लगीनघाई सुरु झाली आहे. अनेक संकटांना तोंड देत या दोघांचा नातं आता लग्नापर्यंत पोहोचलं आहे. मालिकेत अरुंधती-आशुतोषच्या आयुष्यातील तो खास क्षण अवघ्या काही वेळेवर येऊन ठेपला आहे. तत्पूर्वी मालिकेतील विविध व्यक्तिरेखांचे लुक्स आता समोर येत आहेत. विशेष म्हणजे सवत अरुंधतीच्या लग्नासाठी संजनाही झक्कास नटली आहे. संजनाचा फर्स्ट लूक आता समोर आला आहे. स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका आता सर्वांचीच आवडती मालिका बनली आहे. मालिकेत सतत काही ना काही घडामोडी घडतच असतात. सध्या मालिका फारच रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेत अरुंधती आणि आशुतोषच्या लग्नाची घाई सुरु आहे. अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर अखेर तो खास दिवस आलेला आहे. नुकतंच नवराई बनलेल्या अरुंधतीचा लूक समोर आला होता. त्यांनतर आता अरुंधती-आशुतोषच्या लग्नातील संजनाचा लूक व्हायरल होत आहे. (हे वाचा: Renuka Shahane: मराठमोळ्या अभिनेत्यासोबत घटस्फोट,आशुतोष राणांसोबत दुसरं लग्न; खाजगी आयुष्याबाबत बोलल्या रेणुका शहाणे ) राजश्री मराठीने नुकतंच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर संजनाचा पारंपरिक लूक शेअर केला आहे. संजनानेसुद्धा आपल्या इंस्टावर हा व्हिडीओ रिशेअर केला आहे. संजना ही भूमिका अभिनेत्री रुपाली भोसलेने साकारली आहे. नकारात्मक भूमिका असूनसुद्धा रुपालीला चाहत्यांचं भरभरुन प्रेम मिळत आहे.
रुपाली अर्थातच संजनाने सवत अरुंधतीच्या लग्नात साडी नेसली आहे. संजना सुंदर अशा गुलाबी रंगाच्या साडीत पारंपरिक अंदाजात नटली आहे. केसात छान गजरादेखील माळला आहे. सोबतच नाकात घातलेल्या पारंपरिक नथीने संजनाच्या सौंदर्यात आणखीनच भर टाकली आहे. संजनाचा हा लूक चाहत्यांना प्रचंड पसंत पडत आहे.
सुरुवातीला मालिकेत अरुंधती आणि अनिरुद्धच्या मध्ये येत संजनाने त्यांचा संसार उध्वस्त केला होता. त्यांनतर अरुंधतीच्या आयुष्यात आता आशुतोषची एन्ट्री झाली आहे. आत हे दोघेही आपल्या मैत्रीच्या नात्याला लग्नाचं नाव देत आहेत. शिवाय दुसरीकडे संजनाची चांगलीच अद्दल घडली आहे. अनिरुद्धला संजनासोबतही संसार करण्यात आता रस नाहीय. त्यामुळे संजना आता अरुंधतीला चांगली वागणूक देत आहे. आणि तिच्या आनंदात सहभागी होत आहे.