जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'बॉयफ्रेंड की नवरा..?' अश्विनी महांगडेचा खास व्यक्तिसोबतचा रोमॅंटिक व्हिडिओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

'बॉयफ्रेंड की नवरा..?' अश्विनी महांगडेचा खास व्यक्तिसोबतचा रोमॅंटिक व्हिडिओ पाहून चाहत्यांना पडला प्रश्न

_ashvini mahangade

_ashvini mahangade

अश्विनी महांगडे हिनं खास व्यक्तीसोबत रोमॅंटिक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्यक्ती कोण आहे..असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 6मे- सध्या सगळीकडे महाराष्ट्रा शाहीर या सिनेमाची चर्चा सुरू आहे. या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमात अभिनेत्री अश्विनी महांगडे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे. तिच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. शिवाय अश्विनी सध्या एका वेगळ्या कारणामुळं देखील सोशल मीडियावर चर्चेत आहे. तिनं नुकताच एका खास व्यक्तीसोबत रोमॅंटिक असा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अश्विनी महांगडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिनं नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. सोबत त्याला एक कॅप्शन देखील दिली आहे. तिनं म्हटलं आहे की,आधार देणाऱ्याच मन निर्मळ असावं आणि ते अनेक संकटांमधून गेल्यावरच समजते….💞💫..यासोबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या मागे धागे..धागे तोड लाऊ..हे हिंदी गाणं वाजत आहे. अनेकांना अश्विनीचा हा व्हि़डिओ आवडला आहे. या व्हि़डिओत एक खास व्यक्ती दिसत आहे. या दोघांना एकत्र पाहून अनेकांनी जोडी छान असल्याचे म्हटलं आहे. वाचा- भर कॉन्सर्टमध्ये गायकाने आपली अंडरवेअर…, मुंबई शोमध्ये अश्लील प्रकार अश्विनीचा हा व्हिडिओ पाहून कुणी तिला विचारलं आहे की, बॉयफ्रेंड आहे का तर कुणी नवरा आहे का..असा प्रश्न देखील केला आहे. एकानं म्हटलं आहे की, खूप छान ताई - बाबा ✌️…nice couple ♥️…आई तुळजाभवानी तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏😊… तर अनेकांनी असेच एकत्र राहा अशी देखील इच्छा व्यक्त केली आहे.

जाहिरात

कोण आहे तो खास व्यक्ती? अश्विनीनं शेअर केलेल्या या व्हिडिओत जो व्यक्ती दिसत आहे. तो खास व्यक्ती अनेकदा अश्विनीसोबत दिसत असतो. यापूर्वी देखील अश्विनीनं याच्यासोबतचे फोटो, व्हिडिओ शेअर केले आहेत. हा खास व्यक्ती निलेश जगदाळे आहे, आणि तो व्यावसायिक आहे.अश्विनीच्या सामाजिक कार्यात निलेशची देखील साथ तिला मिळताना दिसते. अश्विनी महांगडेने रयतेचे स्वराज्य या प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. या कामात देखील तो नेहमीच तिच्यासोबत असतो.

News18लोकमत
News18लोकमत

यापूर्वी देखील अश्विनीनं निलेशासाठी केली होती एक रोमॅंटिक पोस्ट यापूर्वी अश्विनीने निलेश जगदाळे सोबत एक फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. सोबतच तिने हॅशटॅग माय बर्थडे बॉय लव्ह असे म्हणत एक पोस्ट लिहिली होती. तिनं पोस्टमध्ये म्हटलं होतं की, वाढदिवसाच्या खूप खूप खूप खूप शुभेच्छा बाबा..यश आणि अपयश जे काही असेल ते पाहताना तुम्ही सोबत आहात याचा आनंद आहे बाबा. ‘सगळ्यांना सोबत घेवून पुढे जाणे’ हा तुमचा विचार सगळ्यात जास्त भावला. खूप खूप खूप शुभेच्छा बाबा…#Mybirthdayboy #love #life #lifeline #happy..अश्विनीच्या या पोस्टमुळे ती निलेश जगदाळे याच्या प्रेमात असल्याचे चर्चा रंगलेली होती. आता देखील पुन्हा या नवीन व्हिडिओमुळे यांच्या प्रेमाची चर्चा रंगलेली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात