मुंबई, 6 मे- आपल्या देशात अनेक रसिक प्रेक्षक आहेत. हे लोक नेहमीच कलेला दाद देत असतात. आपल्या देशातील लोक कलेला दाद देत असताना देश किंवा भाषा पाहात नाहीत. त्यामुळेच विदेशातील अनेक कलाकार भारतातही लोकप्रिय आहेत. या कलाकारांना देशामध्ये भरभरून प्रेम मिळत असतं. अशातच विदेशातील अनेक म्युझिक ग्रुप आपल्या देशात प्रसिद्ध आहेत. यातीलच एक लोकप्रिय ग्रुप म्हणजे ‘बॅकस्ट्रीट बॉईज’ होय. नुकतंच बॅकस्ट्रीट बॉईजने मुंबईत आपल्या कॉन्सर्टचं आयोजन केलं होतं. परंतु या कॉन्सर्ट दरम्यान ग्रुपमधील एका कलाकाराने असं काही केलं की सर्वांनाच धक्का बसला. पाहूया नेमकं काय घडलंय. अमेरिकेतील प्रसिद्ध म्युझिक ग्रुपपैकी एक म्हणजे बॅकस्ट्रीट बॉईज’ होय. जगभरात या बँडचे लाखो चाहते आहेत. हा ग्रुप देश-विदेशात जाऊन आपली कला सादर करत असतो. या ग्रुपचे जगभरात चाहते आहेत. यामध्ये आपल्या देशाचे लोकसुद्धा अपवाद नाहीत. सर्वसामान्य तरुणाईपासून ते बॉलिवूड सेलिब्रेटींपर्यंत अनेक लोक या बँडला पसंती देतात. (हे वाचा: शम्मी कपूरच्या दुसऱ्या पत्नीने घेतलेला आई न होण्याचा निर्णय, विनवण्या करुनही सोडला नाही हट्ट, काय होतं कारण? ) नुकतंच मुंबईमध्ये बॅकस्ट्रीट बॉईजच्या लाईव्ह कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. या कॉन्सर्टसाठी अफाट गर्दी झाली होती. यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनीसुद्धा आवर्जून उपस्थिती लावली होती. श्रद्धा कपूर, मलायका अरोरासोबत अनेक क्षेत्रातील सेलिब्रेटी या कॉन्सर्टमध्ये सहभागी झाले होते. या सर्वांनी लाईव्ह कॉन्सर्टचा पुरेपूर आनंद घेतला.
Not at them changing in a box on stage and giving their underwear to fans... 🤣🤣👏👏 #BACKSTREETSBACKINMNL #BackstreetBoys #BSBinManila pic.twitter.com/Dnj4iiTJHl
— 𓆩♡𓆪 music4me 𓆩♡𓆪 (@wela0723) February 20, 2023
मात्र कॉन्सर्टच्या मध्यंतरी असं काही घडलं की, ते पाहून सर्वच चकित झाले. बॅक स्ट्रीट बॉईजच्या मुंबई कॉन्सर्टचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये असं काही आहे जे पाहून लोक टीका करत आहेत. या व्हिडीओमध्ये बॅकस्ट्रीट बॉईजचा एक गायक,डान्सर मॅक्लीनने एक अश्लील कृत्य केल्याचं समोर आलं आहे. या प्रकारामुळे तो वादात सापडला आहे.
या व्हिडीओमध्ये बॅकस्ट्रीट बॉईजचे सदस्य स्टेजवर बॉक्समध्ये कपडे बदलताना दिसून येत आहेत. कपडे बदलून झाल्यानंतर या ग्रुपमधील एक सदस्य मॅक्लीन आपली अंडरवेअर घेऊन बॉक्समधून बाहेर येतो आणि स्टेजच्या समोरील टोकावर जातो. त्यांनतर तो आपल्या हातातील अंडरवेअर उपस्थित असलेल्या लोकांच्या दिशेने फेकतो. आणि लोकांसोबत विचित्र प्रकार करताना दिसतो. हा व्हिडीओ समोर येताच मक्लीनवर प्रचंड टीका होत आहे.