मुंबई, 15 फेब्रुवारी- ‘आई कुठे काय करते’ ( aai kuthe kay karte ) मालिकेत अनघाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे ( ashvini mahangade ) प्रेमात असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे. अश्विनी महांगडेने नुकतीच एक बर्थडे पोस्ट केली आहे ज्यामुळे ती चांगलीच चर्चेत आली आहे. यासोबत तिनं व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी एक फोटो शेअर केलेला पाहायला मिळाला. या दोन पोस्टवरून ती प्रेमात असल्याची चर्चा रंगलेली आहे. या फोटोमध्ये ती ज्या व्यक्तीसोबत दिसत आहे त्यावरून आणि दिलेल्या कॅप्शन वरून ती त्या व्यक्तीच्या प्रेमात तर नाही ना? अशी चर्चा रंगली आहे. अश्विनीने निलेश जगदाळे (nilesh jagdale ) सोबत एक फोटो शेअर करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत सोबतच तिने हॅशटॅग माय बर्थडे बॉय लव्ह असे म्हणत एक पोस्ट लिहिली आहे. तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे की, वाढदिवसाच्या खूप खूप खूप खूप शुभेच्छा बाबा..यश आणि अपयश जे काही असेल ते पाहताना तुम्ही सोबत आहात याचा आनंद आहे बाबा. ‘सगळ्यांना सोबत घेवून पुढे जाणे’ हा तुमचा विचार सगळ्यात जास्त भावला. खूप खूप खूप शुभेच्छा बाबा…#Mybirthdayboy #love #life #lifeline #happy..अश्विनीच्या या पोस्टमुळे ती निलेश जगदाळे याच्या प्रेमात असल्याचे चर्चा रंगलेली आहे.
अश्विनी महांगडे हि रयतेचे स्वराज्य या प्रतिष्ठानची स्थापना केली आहे. निलेश जगदाळे हा व्यावसायिक आहे. अश्विनीच्या सामाजिक कार्यात निलेशची देखील साथ तिला मिळताना दिसते. अस्मिता, स्वराज्यरक्षक संभाजी अशा मालिकांमधून अश्विनी महांगडेने महत्वपूर्ण भूमिका साकारलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. अभिनयासोबतच ती सामाजिक कार्यात देखील नेहमीच सहभागी असते. वाचा- नेहमी चर्चेत असणाऱ्या ‘या’ मराठी मालिका आहेत बंगाली मालिकांचा रिमेक सध्या अश्विनी आई कुठे काय करते या मालिकेत अनघाची भूमिका साकारत आहेत. अनघाची भूमिका देखील प्रेक्षकांना आवडत आहे. नुकतेच तिचं मालिकेत लग्न झालं आहे. त्यामुळे तिचा आणि अभिचा लव्हट्रॅक सध्या मालिकेत दाखवण्यात येत आहे.