जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधतीचा मेकओव्हर, साडीत नव्हे आता या अंदाजात दिसणार अरु

'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधतीचा मेकओव्हर, साडीत नव्हे आता या अंदाजात दिसणार अरु

'आई कुठे काय करते'मध्ये अरुंधतीचा मेकओव्हर, साडीत नव्हे आता या अंदाजात दिसणार अरु

अरुंधतीच्या लुकमध्येसुद्धा मोठा बदल होणार, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. सोशल मीडियावर अरुच्या या नव्या लुकचे फोटो व्हायरल झाले आहेत.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 11 फेब्रुवारी: स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या सीरियलची प्रेक्षकांमध्ये खूप क्रेझ आहे. प्रेक्षक सतत या सीरियलमधील कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. मालिकेत प्रमुख भूमिका असणारी अरुंधती अनेकांना आपलीशी वाटते. अतिशय साध्या लूकमध्ये दिसणारी अरुंधती महिलावर्गामध्ये विशेष लोकप्रिय आहे. अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर (Madhurani Prabhulkar) हिनं अरुंधतीची भूमिका साकारली आहे. मालिकेत सुरुवातीपासूनच अरुंधती साधी, शांत, सोशिक गृहिणी दाखवण्यात आली आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून तिच्यामध्ये बदल होताना दिसत आहे. आता अरुंधती स्वतःच्या हक्कासाठी आवाज उठवताना दिसत आहे. तसेच स्वतःमध्ये असणाऱ्या कलागुणांनाही वाव देत आहे. दरम्यान, निर्माते आता सीरियलमध्ये नवीन ट्विस्ट आणणार असल्याची चर्चा आहे. त्यासाठी अरुंधतीच्या लुकमध्येसुद्धा मोठा बदल होणार, अशी चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. सोशल मीडियावर अरुच्या या नव्या लुकचे फोटो व्हायरल झाले आहेत. हे वाचा- Pushpa च्या Srivalli चा इंग्लिश व्हर्जन रिलीज होताच झाला VIRAL,पाहा VIDEO नेहमीच साडीमध्ये दिसणारी अरुंधती आता आपल्याला चुडीदार ड्रेसमध्ये पाहायला मिळणार आहे. सोबतच तिची हेअरस्टाईलसुद्धा बदलणार आहे. नेहमी एकवेणी घातलेली अरुंधती आता मोकळ्या मॉडर्न हेअरकटमध्ये दिसणार आहे. तिचा हा नवा लुक (Arundhati New Look) पाहण्यासाठी प्रेक्षक फारच उत्सुक आहेत. अरुंधतीचा झालेला मेकओव्हर (Aai Kiuthe Kay Karte Arundhati Makeover) पाहून पती अनिरुद्धची काय प्रतिक्रिया असेल पहाणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

    जाहिरात

    सध्या, मालिका फारच रंजक वळण घेत आहे. अरुंधतीचा जुना मित्र आशुतोष तिच्या आयुष्यात परत आला आहे. हळूहळू आशुतोष अरुंधतीच्या प्रेमात पडत आहे. आशुतोषला अरुंधतीबद्दल असलेल्या प्रेमाची जाणीव तिला होत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे भविष्यात या दोघांचं नातं कोणतं नवं वळण घेणार हे सुद्धा पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. नुकताच मालिकेचा एक नवा प्रोमो (Promo) रिलीज झाला आहे. त्यामध्ये अरुंधती आणि आशुतोष गाण्याचा रेकॉर्डिंगसाठी गेल्याचं दिसत आहे. परंतु, रस्त्यात एक अपघात झाल्यानं रस्ता बंद होतो आणि त्यांना मुंबईबाहेरच एक रात्र काढावी लागणार असल्याचं दाखवण्यात आलं आहे. हे वाचा- VIDEO: मराठमोळ्या राशी शिंदेवर रणवीर सिंहसुद्धा झाला फिदा, म्हणाला छोटी दीपिका अरुंधतीच्या रोलमुळे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली आहे. तिनं सीरियल, नाटक आणि चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केलेलं आहे. आई कुठे काय करते या मालिकेपूर्वी तिनं इंद्रधनुष्य, असंभव या सीरियलमध्ये भूमिका केल्या होत्या. सुंदर माझं घर, गोड गुपित, समांतर, नवरा माझा नवसाचा, मणी मंगळसूत्र या मराठी चित्रपटांतही मधुराणी दिसली होती.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: Tv
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात