मुंबई, 9 एप्रिल-अभिनेत्री धनश्री काडगावकर ( dhanashri kadgaonkar ) तुझ्यात जीव रंगला मालिकेतील वहिनीसाहेब या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली. धनश्री काडगावकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे विविध व्हिडिओ तसेच फोटो ती शेअर करत असते. मुलगा कबीरसोबत क्यूट व्हिडिओ तर नेहमी चर्चेत असताता. धनश्री काडगावकराचा नुकताच वाढदिवस झाला. मात्र यंदा तिच्यासाठी हा वाढदिवस ( dhanashri kadgaonkar birthday ) खास होता. कारण मुलगा कबीर ( dhanashri kadgaonkar baby name) याच्यासोबत तिचा पहिला वाढदिवस होता. विशेष म्हणजे तिच्या आय़ुष्यातील खास दिवस आणखी खास बनवलं तिच्या टीमकडून, तेही खास सरप्राईज देऊन. तिनं याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर केला आहे. वाचा- आप्पांनी चक्क आशुतोषला अरुंधतीसोबत लग्न करण्याची केली विनंती, ‘आई कुठे काय करते’ धनश्रीनं तिच्या इन्स्टावर तिच्या बर्थडे सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ शेअर करत म्हटल आहे की, सरप्राईज बर्थडे सेलिब्रेशन. धनश्रीला तिच्या टीमकडून खास बर्थडे सरप्राईज देण्यात आलं. यावेळी तिच्यासाठी खास केक ऑर्डर करण्यात आला होता. लेकाच्या हाताला धरून धनक्षीनं केक कापला. तिच्यासाठी हा लेकासोबत पहिला वाढदिवस होता. या सरप्राईजचा आनंद तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. मुलगा कबीर देखील खूश दिसला. वाचा- क्रिस्टल डिसूझा या व्यक्तीला करतेय डेट?अभिनय नव्हे तर या क्षेत्राशी आहे निगडीत धनश्री सध्या तिच्या फिटनेसवर लक्ष देत आहे. तिचे फिटनेसचे व्हिडिओ ती सोशल मीडियावर शेअर करत असते. कबीरच्या जन्मानंतर तिचं वजन वाढलं होते. मात्र तिनं फिटनेसची काळजी घेत तिचं वजन कमी केलं आहे. प्रेग्नंसी दरम्यान धनश्री काडगावकरचं वजन 25 किलो वजन वाढलं असल्याचे तिनं नुकतचं एका मुलाखतीत सांगितलं होतं. यामुळे तिला कशाप्रकारे ट्रोलिंगचा ( dhanashri kadgaonkar troll ) सामाना करावा लागला याचा धक्कादायक अनुभव तिनं सांगितला होता.
सध्या ती तिच्या ( dhanashri kadgaonkar transformation ) ट्रान्सफॉर्मेशनमुळे चांगलीच चर्चेत आली आहे. वाढलेले वजन कमी करण्यासाठी सध्या ती वर्कआऊट करताना दिसते. त्याचेच व्हिडिओ ती शेअर करत असते. तिनं वजन कमी केल्याचे दिसते. यासाठी तिनं घेतलेली मेहनत देखील दिसते. आता पुन्हा एकदा धनश्री पूर्वीसारखीच ग्लॅमरस दिसू लागली आहे. दररोज ती वर्कआऊट, योगा, डाएट करत तिने आपलेले वाढलेले वजनही कमी केल्याचे पाहायला मिळतंय. तिच्या फोटोशूटमुळे ती नेहमीच लक्षवेधून घेत असते.